पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Wimbledon 2019 : फेडरर-जोकोव्हिचमध्ये रंगणार फायनल

रॉजर फेडरर

यंदाच्या वर्षातील तिसऱ्या ग्रॅंडस्लॅम स्पर्धेतील (विम्बल्डन) पुरुष एकेरीच्या दुसऱ्या सेमीफायनलमध्ये स्वीसच्या रॉजर फेडररने स्पॅनिश राफेल नदालला पराभूत करत फायनल गाठली.  त्याच्यासमोर आता गतविजेत्या आणि जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या नोव्हाक जोकोव्हिचचे आव्हान असणार आहे. 

फेडररने दुसऱ्या सेमीफायनलमध्ये 3 तास 2 मिनिटे चाललेल्या सामन्यात नदालचा 7-6(7-3), 1-6, 6-3, 6-4 असे पराभूत केले. या विजयासह फेडररने बाराव्या वेळी विम्बल्डनच्या फायनलमध्ये धडक मारली आहे. तब्बल 11 वर्षांनंतर ही जोडी विम्बल्डनच्या कोर्टवर एकमेकांविरुद्ध आली होती. 2008 मध्ये विम्बल्डनच्या फायनलमध्ये  नदालने फेडररला पराभवाचा धक्का दिला होता. यापूर्वी दोनवेळा रॉजर फेडररने विम्बल्डनच्या कोर्टवर नदालला पराभूत केले होते. फेडररने यंदाच्या स्पर्धेत तिसऱ्यांदा नदालला पराभूत करत विम्बल्डनमधील आपली नदाल विरुद्धची कामगिरी 3-1 अशी केली.   

जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या 37 वर्षीय फेडररने आतापर्यंत 20 वेळा ग्रँडस्लॅम स्पर्धा गाजवली आहे. या यादीत राफेल नदाल 18 ग्रँडस्लॅमसह दुसऱ्या तर नोव्हाक जोकोव्हिच 15 ग्रँडस्लॅमसह तिसऱ्या स्थानावर आहे. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:wimbledon 2019 roger federer defeated rafael nadal now federer would fight with novak djokovic in finals