भारतीय संघाचा जलदगती गोलंदाज दीपक चाहर दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. पाठिच्या दुखापतीतून सावरुन तो आयपीएलच्या मैदानातून पुन्हा एकदा आपल्यातील क्षमता सिद्ध करेल.एका मुलाखतीमध्ये दीपकने दुखापत आणि आयपीएल संदर्भात मनमोकळ्या गप्पा मारल्या. यावेळी त्याने आयपीएलमधील सर्व सामने खेळणार असल्याचेही म्हटले आहे.
अखेर नव्या वर्षात हार्दिकची नताशासोबतच्या प्रेमाला कबुली
दीपक म्हणाला की, दोन वर्ष सातत्यपूर्ण क्रिकेट खेळत असल्यामुळे दुखापत उदभवली. त्यामुळे आगामी काळात नियोजन काळजीपूर्वकच करावे लागले. योग्य विश्रांती मिळाल्यानंतर आयपीएलमध्ये मोजके सामने खेळण्याची गरज पडत नाही. आयपीएलच्या हंगामात दोन महिन्यात १४ सामने खेळावे लागतात. जर १२ दिवसांत ८ ते ९ सामने खेळावे लागले तर त्रास होता, असेही तो म्हणाला.
अनुष्काच्या या कलेचं विराटकडून कौतुक
यावेळी त्याने रणजी ट्रॉफी आणि विजय हजारे चषकातील नियोजनावरही भाष्य केले. देशांतर्गत क्रिकेटमधील या दोन महत्त्वपूर्ण स्पर्धेत बऱ्याचदा लागोपाठ सामने खेळावे लागतात. विजय हजारे चषक स्पर्धेतील हंगामात पाच दिवसाच्या आता चार सामने खेळलो होतो. त्यामुळे दुखापतीचा सामना करावा लागला, असेही त्याने सांगितले.
जलदगती गोलंदाजाचा पराक्रम! सचिन-द्रविड या दिग्गजांच्या पक्तींत स्थान
दीपकला पाठीच्या खालच्या भागात स्ट्रेस फ्रॅक्चर असल्यामुळे वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेतून संघाबाहेर पडला होता. जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार यांच्यानंतर त्यालाही दुखापतीतून जावे लागत आहे. जानेवारीत श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर केल्यानंतर बीसीसीआयचे निवड प्रमुख एमएसके प्रसाद यांनी दुखापतीची पुष्टी दिली होती. त्याच्या ऐवजी युवा गोलंदाज नवदीप सैनीला संधी देण्यात आली आहे.