विश्वचषक स्पर्धेनंतर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि उप कर्णधार रोहित शर्मा यांच्यात मतभेद असल्याची चर्चा रंगली होती. बीसीसीआयचे स्पष्टीकरण आणि विराट कोहलीच्या प्रतिक्रियेनंतर विराट-रोहित मतभेदांची चर्चा थांबली. मात्र दोघांमधील मतभेदाच्या चर्चेनंतर मैदानात त्यांच्यात भन्नाट दोस्तानावाली झलक काही क्रिकेट चाहत्यांना पाहायला मिळालेली नाही. त्यामुळे दोघांच्यातील मतभेद कायम आहेत का? असा प्रश्न आजही काही क्रिकेट चाहत्यांच्या मनात आहेच.
...म्हणून चहल-यादव जोड गोळीला संघात स्थान मिळेना!
भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक यांनी आता दोघांच्यामध्ये कोणतेही मतभेद नसल्याचे सांगितले आहे. १५ सदस्यांच्या संघात सर्वांचे विचार एकसारखे असतीलच असे नाही, असे सांगत कर्णधार -उपकर्णधार वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. शास्त्री गल्फ न्यूजला दिलेल्या मुलाखतीवेळी म्हणाले की, मी ड्रेसिंग रुममध्ये गेल्या पाच एक वर्षांपासून आहे. सर्वांनी आपल्यावर सोपवलेली जबाबदारी चोख पार पाडली आहे. विराट-रोहित यांच्या मतभेदावर त्यांनी रोहित शर्माच्या विश्वचषकातील कामगिरीचा दाखला दिला.
ऐतिहासिक विजयानंतर अफगानच्या बच्चे कंपनीचा VIDEO व्हायरल
विश्वचषकात दोघांमध्ये चांगली भागीदारी पाहायला मिळाली. शिवाय रोहित शर्माने सर्वाधिक ५ शतके झळकावली. दोघांच्यामध्ये मतभेद असते तर हे चित्र पाहायला मिळाले नसते, असे रवी शास्त्री म्हणाले आहेत. संघाच्या ड्रेसिंगरुममधील वातावरण खेळीमेळीचे असल्याचे सांगत युवा खेळाडूंना देखील त्यांचे मत मांडण्याचे स्वातंत्र्य असल्याच्या गोष्टीवरही त्यांनी भर दिला.