पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

WC 2019 :..तर भारताविरुद्धच्या विजयामुळे न्यूझीलंड विश्वविजेता ठरेल!

भारताला पराभूत करत न्यूझीलंडने फायनल गाठली होती.

इंग्लंड आणि वेल्समध्ये सुरु असलेल्या विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचा प्रवास मँचेस्टरच्या मैदानात संपला. न्यूझीलंडने भारताला १८ धावांनी पराभूत करत फायनलमध्ये धडक मारली. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाला पराभूत करत यजमान इंग्लंडचा संघ फायनलमध्ये पोहचला आहे. लॉर्डसच्या मैदानात रविवारी हे दोन संघ पहिल्यांदा विश्वचषक पटकवण्याच्या इराद्याने मैदानात उतरतील. 

WC क्रिकेटच्या पंढरीत इंग्लंड-न्यूझीलंड पूर्ण करणार वर्ल्ड कपचं रिंगण

भारताचा इतिहास न्यूझीलंडसाठी फायदेशीर असा आहे.   विश्वचषकातील आतापर्यंतचा इतिहास पाहिला तर भारतीय संघाला पराभूत करणाऱ्या संघाने विश्वचषक पटकावला आहे. हा अनोखा योगायोग यंदाच्या विश्वचषकात जूळून आला तर न्यूझीलंडचा संघ यंदाची विश्वचषक स्पर्धा जिंकू शकतो.   

विश्वचषक स्पर्धेतील अनोखा योगायोग
 

१९८७, १९९६ आणि २०१५ च्या विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाला सेमीफायनलमध्ये पराभूत करणाऱ्या संघाने विश्वचषक उंचावला होता. १९८३ आणि २०११ या वर्षी भारतीय संघांने विश्वचषक जिंकला होता. २००३ मध्ये ऑस्ट्रेलियाने भारताला १२५ धावांनी पराभूत करत विश्वचषकावर नाव कोरले होते.

१९८७ च्या विश्वचषकातील सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने भारताला पराभूत कले होते. त्यावर्षी ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला पराभूत करत जेतेपद पटकावले. 

१९९६ च्या विश्वचषकातही भारतीय संघ सेमीफायनलपर्यंत पोहचला. यावेळी श्रीलंकेने भारताला पराभूतक करत फायनल गाठली आणि त्यावर्षी विश्वचषकही जिंकला.  

२०१५ मध्ये ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात सेमीफायनल झाली होती. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला ९५ धावांनी  पराभूत करत फायनल गाठली आणि स्पर्धा ही जिंकली. यंदाच्या विश्वचषकात हा योगायोग पुन्हा अनुभवायला मिळणार की यजमान इंग्लंडच भारी ठरणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

#ENGvAUS, Video: संघाची काळजी, रक्तबंबाळ होउनही कॅरी भारी खेळला

आयसीसी विश्वचषकातील न्यूझीलंडचा इतिहास  
१९७५ : सेमीफायनलमध्ये वेस्ट इंडिजकडून पराभूत
१९७९  सेमीफायनमध्ये इंग्लंडकडून पराभूत 
१९९२  सेमीफायनलमध्ये पाकिस्तानकडून पराभूत 
१९९९  सेमीफायनलमध्ये श्रीलंकेकडून पराभूत 
२००७  सेमीफायनलमध्ये श्रीलंकेकडून पराभूत 
२०११ सेमीफायनलमध्ये श्रीलंकेकडून पराभूत 
२०१५ फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडून पराभूत 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: which team beat india in world cup semifinal wins world cup title too is new zealand going to bag the title this time read