पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

धोनीच्या निवृत्तीवर शास्त्रींनी केली 'मन की बात'

रवि शास्त्री आणि धोनी (संग्रहित छायाचित्र)

भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवि शास्त्री यांनी धोनीच्या पुनरागमनाविषयी भाष्य केले आहे. धोनीने संघात परतण्याचा निर्णय स्वत: घ्यायचा असल्याचे सांगितले. संघात परतण्यासाठी त्याला खेळ पुन्हा सुरु करावा लागेल, असेही ते यावेळी म्हणाले. इंग्लंडमध्ये रंगलेल्या विश्वचषक स्पर्धेपासून महेंद्रसिंह धोनी संघाबाहेर आहे. तेव्हापासून धोनीला भेटलेलो नाही. तसेच विश्वचषकापासून मी धोनीला मैदानात उतरल्याचेही पाहिलेले नाही.

तो भारतीय क्रिकेटला लाभलेला एक प्रतिभावंत खेळाडू आहे. त्यामुळे संघात परतण्याचा निर्णय तो स्वत: घेईल. यासाठी त्याला पुन्हा क्रिकेट खेळण्यास सुरुवात करावी लागेल. यासंदर्भात त्याला बीसीसीआयच्या निवड समितीला माहिती द्यावी लागेल, असे शास्त्री यांनी 'द हिंदू' ला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटले आहे. तो क्रिकेटमधून महान खेळाडू म्हणूनच निवृत्त होईल, असा उल्लेख देखील शास्त्रींनी यावेळी केला.  

उत्तेजक द्रव्य भोवले, शेरॉनवर पदकाची मंदी अन् ४ वर्षांची बंदी

विश्वचषक स्पर्धेनंतर धोनीने विंडीज दौऱ्यातून माघार घेतली होती. भारत दौऱ्यावर असलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यापासूनही तो दूर आहे. मात्र निवृत्तीबद्दल त्याने कोणताही निर्णय घेतलेला नाही. धोनीने मैदानातून निवृत्ती घ्यावी अशी त्याच्या अनेक क्रिकेट चाहत्यांची इच्छा आहे. शास्त्रींच्या विधानावरुन धोनी मैदानातून निवृत्ती घेणार असल्याचे संकेत मिळत आहेत. मात्र तो संघात कधी परतणार हे चित्र मात्र अद्यापही अस्पष्टच आहे.

मिताली 'राज'! तेंडुलकर, मियादांद अन् जयसूर्या या दिग्गजांच्या यादीत

इंग्लंडमध्ये रंगलेल्या विश्वचषक स्पर्धेतून धोनी निवृत्ती घेणार असल्याची चर्चा चांगलीच रंगली होती. मात्र त्या सर्व चर्चा फोल ठरल्या होत्या. त्यानंतर पंतला अधिक पसंती मिळत असल्याने ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-२० विश्वचषकात धोनी संघासोबत राहणार याबाबतचा संभ्रम कायम आहे. याच उत्तर फक्त धोनीकडेच आहे, हे शास्त्रींच्या विधानातून पुन्हा एकदा समोर आले आहे.