पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

विक्रमादित्य सचिनने दिला 'त्या' वेदनादायी आठवणींना उजाळा

सचिन तेंडुलकर

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने दोन दशकाहून अधिककाळ क्रिकेट जगतात अधिराज्य गाजवले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतकांचे शतक करण्याचा विश्वविक्रम आपल्या नावे करणाऱ्या सचिनला क्रिकेट कारकिर्दीत अनेक दुखापतीनी हैराण केल. त्यातील टेनिस एल्बोची दुखापत तो अजूनही विसरलेला नाही. इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्याने टेनिस एल्बोच्या वेदनादायी आठवणींना उजाळा दिलाय. टेनिस एल्बोच्या शस्त्रक्रियेनंतरचा काळ फार कठीण होता, असे त्याने म्हटले आहे.  

सुवर्णपदाकासह वेटलिफ्टर मीराबाई चानूची ऑलिम्पिकच्या दिशेन वाटचाल

इंडिया टुडे टेलिव्हिजनवरी विशेष कार्यक्रमात सचिन म्हणाला की, टेनिस एल्बोच्या दुखापतीचा अनुभव खूप वाईट होता. माझ्या अनेक सहकाऱ्यांना देखील या दुखापतीतून जावे लागले आहे. या दुखापतीमुळे तुम्ही बॅट हातातही घेऊ शकत नाही. टेनिस एल्बोच्या दुखापतीनंतर माझी अवस्था ही एका बंद खोलीत ठेवून बाहेरुन कुलूप लावल्यासारखी झाली होती, असेही सचिन यावेळी म्हणाला.  

Video: IPL मध्ये कोट्यवधी उगाच मिळाले नाहीत हे मॅक्सवेलनं दाखवून दिलं

२००३ च्या विश्वचषकातील पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात  तेंडुलकरने शोएब अख्तरच्या गोलंदाजीवर थर्ड मॅनला लगावलेला षटकार आणि पायत गोळे आल्यानंतर ९८ धावांवर बाद झाल्याचा तो क्षण क्रिकेट चाहता अजूनही विसरलेला नसेल. या सामन्यात तेंडुलकरने रनर घेतल्याचेही पाहायला मिळाले. या सामन्यातील आठवणीला उजाळा देताना सचिन म्हणाला की, मला उभा रहाणे अशक्य झाले होते.

INDvsWI : रविवारच्या दिवशी पराभवाचा 'चौकार' रोखण्याचं आव्हान

५०० किलो वजन माझ्या अंगावर असल्यासारखे वाटत होते. माझ्या कारकिर्दीतील हा एकमेव सामना होता ज्यामध्ये मला रनर घ्यावा लागला, असेही सचिन म्हणाला. सेहवाग सचिनचा रनर म्हणून आला होता. या सामन्यात शोएब अख्तरच्या उसळत्या चेंडूवर सचिन ९८ धावांवर बाद झाला होता. सचिनच्या या खेळीच्या जोरावर भारताने सामना जिंकला होता. या विश्वचषक स्पर्धेत सचिनने सर्वाधिक ६७३ धावा केल्या होत्या.