पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

गांगुली यांच्या नियुक्तीवर शास्त्रींनी केली 'मन की बात'

शास्त्री आणि गांगुली

भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी बीसीसीआयच्या अध्यक्षपदी विराजमान झालेल्या सौरव गांगुली यांना मनपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत. भारतीय संघाला आणखी पुढे घेऊन जाण्यासाठी हा निर्णय उपयुक्त ठरेल अशी प्रतिक्रिया शास्त्री यांनी दिली. 'टाइम्स ऑफ इंडिया'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये शास्त्रींनी गांगुली यांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागणार असल्याचेही म्हटले आहे.

टी-20 विश्वचषक : PM मोदी अन् ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांची 'बोलंदाजी'

गांगुली म्हणजे नेतृत्वाचा स्वाभाविक गुण असणारे व्यक्तिमत्व असून चार-पाच वर्षांत त्यांनी बंगाल क्रिकेटचे अध्यक्षपद उत्तमरित्या भुषवले. भारतीय क्रिकेट मंडळाचा प्रवास हा खडतर मार्गाने सुरु असताना त्यांची अध्यक्षपदी झालेली नियुक्ती आनंददायी आहे. पण कमी कालावधीत बीसीसीआयची छबी सुधारण्यासाठी गांगुली यांना मेहनत घ्यावी लागेल, असे शास्त्री म्हणाले.  

दिवस-रात्र कसोटी सामने खेळण्यासाठी कोहली 'राजी'

धोनीला निवृत्तीचा सल्ला देणाऱ्यांनाही शास्त्रींनी चांगलेच सुनावले. ज्या लोकांना आपल्या 'शूजची लेस' देखील बांधता येत नाही, असे लोक धोनीला निवृत्तीचा सल्ला देत आहेत. त्यांच्याकडे चर्चा करण्यासाठी काही मुद्दा नसावा. धोनी स्वत: योग्यवेळी योग्य निर्णय घेईल. १५ वर्षांपासून भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या खेळाडूला सल्ला देणे योग्य नाही, असेही शास्त्री यावेळी म्हणाले.