पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

भारतीय महिलांनी कॅरेबियन महिलांना केलं क्लीन स्विप

भारतीय महिलांची दमदार खेळी

भारतीय महिला क्रिकेट संघाने कॅरेबियन महिलांना घरच्या मैदानावर क्लीन स्वीप करण्याचा पराक्रम करुन दाखवला आहे. प्रोविंस स्टेडियमवर गुरुवारी खेळवण्यात आलेल्या पाच सामन्यांच्या मालिकेतील अखेरच्या टी-२० सामन्यात भारीतय महिलांनी ६१ धावांनी जिंकत मालिका ५-० अशी जिंकली. यापूर्वी भारतीय महिलांनी तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिका २-१ अशी जिंकली होती. 

ऐतिहासिक सामन्याची उत्सुकता भारत-पाक सामन्यासारखी: कोहली

अखेरच्या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय महिला संघाने निर्धारित २० षटकात ३ बाद १३४ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना कॅरेबियन महिला निर्धारित २० षटकात ७ बाद ७३ धावांपर्यंत मजल मारु शकल्या. यजमान संघाकडून कायशोना नाइट २२ तर कॅम्पबेलने १९ धावांची खेळी केली. इतर महिलांना दोन अंक धावसंख्याही गाठता आली नाही. भारताकडून अनुजा पाटीलने दोन तर राधा यादव, पूनम यादव,पूजा वस्त्राकर आणि हलीर्न देओल यांनी प्रत्येकी एक-एक बळी टिपले.  

'महापरिनिर्वाण दिनी भारत-विंडीज सामन्यासाठी पोलीस बंदोबस्त अशक्य'

भारतीय संघाकडून वेदा कृष्णमुर्तीने नाबाद ५७ तर जेमिमा रोड्रिगेज हिने ५० धावांची दमदार खेळी केली. वेस्ट इंडीजकडून हॅली मॅथ्यूज, कर्णधार अनीसा मोहम्मद आणि आलायह यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली.