पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

INDvWI 3rd ODI: सलामवीरांची वादळी खेळी,विंडीजच्या नावे अनोखा विक्रम

गेल आणि लुईस

घरच्या मैदानावर अस्तित्वपणाला लागलेल्या विंडीजने तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील अखेरच्या सामन्यात दमदार सलामी देत संघाला चांगली सुरुवात करुन दिली. ख्रिस गेल आणि एविन लुईस जोडीनं विंडीजच्या डावाला सुरुवात केली. या जोडीनं पहिल्या विकेटसाठी तब्बल ११५ धावांची दमदार भागीदारी रचली. विशेष म्हणजे या जोडीने पहिल्या १० षटकांच्या आतच संघाच्या धावफलकावर १०० धावा लावल्या.

विंडीजचा धाकड गडी वजन कमी करण्यासाठी करतोय मोठी कसरत

सलामीवीर लुईसने २९ चेंडूत ५ चौकार आणि ३ षटकाराच्या मदतीने ४३ धावा केल्या. आक्रमक खेळी करणाऱ्या लुईसला चहलने धवनकरवी झेलबाद केले. दुसऱ्या बाजूला गेलची फटकेबाजी सुरुच होती. गेलने या सामन्यात आपले ५४ वे एकदिवसीय अर्धशतक झळकावले. शतकाच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या गेलला खलिल अहमदने माघारी धाडले.  

Ashes 2019 : लॉर्डसवर 'लॉर्ड' खेळीसाठी इंग्लंड संघात मोठा फेरबदल

२०१२ पासून आतापर्यंत पहिल्या १० षटकात १०० धावांचा टप्पा पार करणाऱ्या संघाच्या यादीत विंडीज दुसऱ्या स्थानावर पोहचले आहे. या यादीत न्यूझीलंड अव्वलस्थानी आहे. २०१५ मध्ये न्यूझीलंडने ख्रिस्टचर्चच्या मैदानात श्रीलंकेविरुद्ध ८.२ षटका ११८ धावा केल्या होत्या. त्यानंतर न्यूझीलंडने इंग्लंडविरुद्ध १० षटकात ११६ धावा करण्याचा दुसऱ्यांदा पराक्रम केला. विंडीजच्या जोडीने भारताविरुद्धच्या सामन्यात पहिल्या १० षटकात ११४ धावा ठोकल्या. हा एक अनोखा विक्रमच विंडीजच्या संघाच्या नावे जमा झाला आहे.