पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

WI vs IND: पहिल्या शतकासह हनुमानं 'नर्व्हस नाईंटी'चा हिशोब केला चुकता!

हनुमा विहारी आणि ईशांत शर्मा

विंडीज विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात 'नर्व्हस नाईंटी'चा शिकार झालेल्या भारताच्या अष्टपैलू हनुमा विहारीने दुसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात शतकी कामगिरीची नोंद केली. सबीना पार्कच्या मैदानात त्याने आपल्या कारकिर्दीतील पहिलं वहिलं शतक साजरे केलं. या शतकासाठी त्याने २०० चेंडूचा सामना केला. त्याच्या या खेळीत १६ चौकारांचा समावेश आहे. त्याच्या पाठोपाठ ईशांत शर्माने चौकाराच्या मदतीने कसोटी कारकिर्दीतील आपले पहिलं अर्धशतक साजरे केले. या दोघांनी मिळून १०० धावांची भागीदारी देखील पूर्ण केली. 

WI vs IND, Video : मंयकच्या फलंदाजीवेळी निर्णयात झोल, अंपायर ट्रोल

मयंक अग्रवाल (५५) आणि विराट कोहली (७६) धावांच्या अर्धशतकी खेळीनं पहिल्याच दिवशी भारताला मजबूत स्थितीत नेऊन ठेवले. ही जोडी तंबूत परतल्यानंतर हनुमा विहारीने सामन्याची सूत्रे आपल्या हाती घेतली. दुसऱ्या दिवशीच्या खेळात पंत (२७) आणि जडेजा (१६) धावा करुन परतल्यानंतर ईशांत शर्माच्या साथीनं हनुमा विहारीनं  भारताची वाटचाल मोठ्या धावसंख्येच्या दिशेने नेली.  

WI vs IND 2nd Test Day 2: पंतचं ये रे.. माझ्या मागल्या गाणं सुुरुच 

पहिल्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात ३२ धावांवर बाद झालेल्या हनुमा विहारीने दुसऱ्या डावात १२३ चेंडूत १० चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ९३ धावांची खेळी केली होती. या सामन्यात तो शतकाला गवसणी घालण्यासाठी अवघ्या ७ धावांनी दूर असताना विंडीज कर्णधार जेसन होल्डरने तंबूचा रस्ता दाखवला होता. तो बाद झाल्यानंतर भारताने आपला दुसरा डाव घोषीत केला होता. हा सामना भारताने मोठ्या फरकाने जिंकलाही होता. त्यानंतर दुसऱ्या कसोटीतील पहिल्या डावात हनुमाने आयुष्यातील अविस्मरणीय क्षणाला गवसणी घातली.