पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

WI vs IND 2nd Test Day 2: पंतचं ये रे.. माझ्या मागल्या गाणं सुरुच

जेसन होल्डरने पंतला दुसऱ्या दिवशी पहिल्याच चेंडूवर तंबूत धाडले

सबीना पार्कवर सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवसाच्या डावाच्या सुरुवातीलाच विंडीजचा कर्णधार जेसन होल्डरने पंतला माघारी धाडले. पहिल्या दिवशीच्या ५ बाद २६४ धावांवरुन हनुमा विहारी आणि ऋषभ पंतने दुसऱ्या दिवशीच्या खेळाला सुरुवात केली. पंतला त्रिफळाचित करत होल्डरने पंतला आल्या पावली तंबूचा रस्ता दाखवला. 

धोनीच्या जागेवर स्थान देण्यात आलेल्या पंतला विंडीजविरुद्धच्या कसोटीत मिळालेल्या संधीचं सोन करुन दाखवण्यात पुन्हा एकदा अपयश आले. पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात पंतने ४७ चेंडूत ४ चौकाराच्या मदतीने २७ धावा केल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या डावात १० चेंडूत केवळ ७ धावांची भर घालून परतला होता.

WI vs IND 2nd Test; DAY-1: ऋषभ पंत-हनुमा विहारीने सावरला डाव 

लोकेश राहुल (१३), पुजारा (६), रहाणे २४ धावा करुन स्वस्तात माघारी फिरल्यानंतर सलामीवीर मयंक अग्रवाल (५५) आणि विराट कोहली (७५) यांनी संघाचा डाव सावरला. या दोघांच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने सामन्यावर पकड मिळवली. पहिल्या दिवशीच मैदानात उतरलेल्या पंतने हनुमा विहारीच्या साथीनं संयमी खेळ दाखवला. मात्र त्याने मोठी धावसंख्या करण्याची संधी पुन्हा एकदा गमावली. दुसऱ्या डावाच्या पहिल्याच चेंडूवर होल्डरच्या गोलंदाजीवर तो त्रिफळाचित झाला.

बेस्ट! महिला कंडक्टरच्या लेकराची युवा टीम इंडियात वर्णी

त्याने ६५ चेंडूत २ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने २७ धावांचे योगदान दिले. विडींज कर्णधार जेसन होल्डरचा सामन्यातील तो चौथी शिकार ठरला. यापूर्वी होल्डरने लोकेश राहुल, मयंक अग्रवाल आणि कर्णधार विराट कोहलीला माघारी धाडले होते.