पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

INDvWI : चौथ्या दिवशीच विंडीजचा खेळ खल्लास! टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

बुमराहने सलामी जोडीला धाडले माघारी

जसप्रित बुमराहचा भेदक मारा आणि त्याला ईशांत शर्मा आणि मोहम्मद शमीने दिलेल्या साथीच्या जोरावर अँटिग्वाच्या मैदानावर भारताने विंडीजचा दुसरा डाव अवघ्या १०० धावांत आटोपले. भारताने हा सामना ३१८ धावांनी चौथ्या दिवशीच खिशात घालत दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. याशिवाय विराटच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने परदेशातील सर्वात मोठ्या फरकाने विजय मिळवत नवा इतिहास देखील रचला आहे. यापूर्वी भारतीय संघाने २०१७ मध्ये श्रीलंकेविरुद्ध ३०४ धावांनी कसोटी सामना जिंकला होता.  

विंडीजचा पहिला डाव २२२ धावांत आटोपल्यानंतर ७५ धावांच्या आघाडीसह मैदनात उतरलेल्या भारतीय संघाने दुसऱ्या डावात ७ बाद ३४३ धावांवर आपला डाव घोषित केला. तिसऱ्या दिवसाअखेर कर्णधार विराट कोहली ५१(१११) आणि उपकर्णधार ५३ (१४४) धावांवर खेळणाऱ्या चौथ्या दिवशीच्या डावाला सुरुवात केली. कोहलीला एकही धाव न करता ५१ धावांवर चेसचा शिकार झाला. त्यानंतर अजिंक्य रहाणेनं हनुमा विहारीच्या साथीनं भारताचा  डाव पुढे नेला. पहिल्या डावात अर्धशतकी खेळी करणाऱ्या  अजिंक्य रहाणेनं २४२ चेंडूत १०२ धावा करत शतकी खेळी केली. दुसऱ्या बाजूने हनुमा विहारीनं १२८ चेंडूत ९३ धावांची खेळी केली. शतकाच्या उंबरठ्यावर असलेल्या हनुमा विहारीची विकेट पडताच भारतीय कर्णधार विराट कोहलीने दुसरा डाव घोषित केला. पंत अवघ्या ७ धावा करुन परतल्यानंतर मैदानात आलेला जडेजा १ धावांवर नाबाद राहिला. 

 INDvWI 1st Test Match : विडींजचा पहिला डाव २२२ धावांत आटोपला

दुसऱ्या डावानंतर भारताने दिलेल्या४१९ धावांचा पाठलाग करताना विंडीजच्या संघाची सुरुवात खराब झाली. सलामीवीर क्रेग ब्रेथवेट (१) आणि जॉन्ह कॅम्पबेल (७) धावांवर माघारी परतले. बुमराहने त्यांना माघारी धाडले. त्यानंतर २ धावांवर खेळणाऱ्या शेमराह ब्रुक्सला ईशांत शर्माने पायचित केले. त्यापाठोपाठ २ धावांवर खेळणाऱ्या शेरमन हेटमायरला बाद करत ईशांतने विंडीजला चौथा धक्का दिला. डेरेन ब्रावोचा अवघ्या २ धावांवर त्रिफळा उडवत बुमराहने विंडीजला पाचवा धक्का दिला. चौथ्या दिवसाच्या चहापानापर्यंत भारतीय गोलंदाजांनी विंडीजचा अर्धा संघ १५ धावांत तंबूत धाडला. 

त्यानंतर बुमराहने दुसऱ्या डावातील वैयक्तिक चौथे आणि भारतासाठी सहावे यश मिळवत होपला बाद करत विंडीजच्या अडचणी आणखी वाढवल्या शाय होप २ धावा करुन माघारी फिरला. त्यानंतर बुमराहने विंडीज कर्णधार जेसन होल्डरला ८ धावांवर माघारी धाडत डावात ५ बळी मिळवण्याचा पराक्रम केला. विंडीजने होल्डरच्या रुपात सातवा गडी गमावला. बुमराह आणि ईशांत शर्माच्या भेदक माऱ्यानंतर मोहम्मद शमीने आपली जादू दाखवली. त्याने रोस्टन चेस (१२) आणि गार्बिएल (०) यांना तंबूत धाडत भारताला विजयाच्या उंबरठ्यावर आणून ठेवले. ईशांत शर्माने केमार रोचला पंतकरवी झेलबाद करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केला.   

 तत्पूर्वी, पहिल्या डावाप्रमाणे दुसऱ्या डावातही सलामीवीर मयंक अग्रवाल  अपयशी ठऱला. रोस्टन चेसने त्याला १६ धावांवर माघारी धाडले. संयमी खेळी करणाऱ्या लोकेश राहुललाही चेसने ३८ धावांवर तंबूचा रस्ता दाखवला. तर रोचने चेतेश्वर पुजाराला २५ धावांवर बाद केले. भारताच्या धावफलकावर ३ बाद ८१ धावा असताना कर्णधार विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे यांनी डावाला आकार दिला. 

INDvWI 1st Test : जडेजाचे अर्धशतक, भारताचा पहिला डाव २९७ धावांत आटोपला

भारत पहिला डाव : ९६.४ षटकात सर्व बाद २९७
अजिंक्य रहाणे : ८१(१६३)
रविंद्र जडेजा  : ५८ (११२)
लोकेश राहुल : ४४ (९७)
हनुमा विहारी ३२ (५६) 
 
गोलंदाजी 
केमार रोच : ४/६६
शेनॉन गार्बिएल: ३/७१
रोस्टन चेस : २/५८
जेसन होल्डर : १/३६

--------------------------------------------------------------------------

संक्षिप्त धावफलक

वेस्ट इंडिज पहिला डाव : ७४.२ षटकात सर्वबाद २२२
रोस्टन चेस : ४८ (७४)
जेसन होल्डर : ३९ (६५)
शेमरॉन हेटमायर : ३५ (४७)
 
गोलंदाजी 
ईशांत शर्मा : ५/४३
मोहम्मद शमी : २/४८
रविंद्र जडेजा : २/६४
जसप्रीत बुमराह १/५५
----------------------------------------------------------------------------
भारत दुसरा डाव : ११२.३ षटकात ७ बाद ३४३ धावांवर घोषित
अजिंक्य रहाणे : १०२ (२४२)
हनुमा विहारी : ९३ (१२८)
विराट कोहली : ५१ (११३)

गोलंदाजी 
रोस्टन चेस : ४/१३२
केमार रोच, गार्बिएल आणि जेसन होल्डर प्रत्येकी एक-एक विकेट
----------------------------------------------------------------------------

विडींजचा दुसरा डाव : २६.५ षटकात सर्व बाद १०० 
केमार रोच : ३८ (३१)
मिगुल कमिंन्स  १९ (२२)*
रोस्टन चेस : १२ (२९)
जेसन होल्डर : ८ (१९)
 

गोलंदाजी 
जसप्रित बुमराह : ५/७
ईशांत शर्मा : : ३/३१
मोहम्मद शमी : : २/१३

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:West Indies vs India 1st Test Live Cricket Score Commentary Virat Kohli and Ajinkya Rahane not out half century India lead by 260 runs