पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

WI vs IND 1st T20: राहुलकडे पाकच्या बाबरचा विश्वविक्रम मोडण्याची संधी

लोकेश राहुल

भारतीय सलामीवीर लोकेश राहुल आंतरराष्ट्रीय टी-२० प्रकारात हजारीच्या उंबरठ्यावर आहे. टी-२० मध्ये १ हजार धावा पूर्ण करण्यासाठी त्याला केवळ १२१ धावांची आवश्यकता आहे. विंडीज विरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत हजारी पूर्ण करुन त्याला पाकिस्तानी फलंदाज बाबर आझमचा विश्वविक्रम मोडीत काढण्याची संधी आहे.

भारतीय संघाचा प्रशिक्षक व्हायचं आहे, पण..: सौरभ गांगुली

लोकेश राहुल वेस्ट विंडिज विरुद्धच्या टी-२० मालिकेत १२१ धावा करुन हजारीचा टप्पा गाठल्यास तो टी-२० मध्ये हजार धावा करणारा भारताचा सातवा फलंदाज ठरले. जर त्याने पहिल्याच सामन्यात शतकी खेळी करुन हा टप्पा गाठला तर २५ व्या डावात हजार धावांचा टप्पा करण्याचा विक्रम त्याच्या नावे नोंद होईल. 

INDvsWI, 1st T20: रोहित शर्मा मोडणार गेलचा रेकॉर्ड ?

पाकिस्तानी फलंदाज बाबर आझमने २६ डावात हजारीचा टप्पा पार केला होता. भारतीय कर्णधार विराट कोहलीने असा पराक्रम करण्यासाठी २७ डाव खेळले होते. राहुलच्या नावे टी-२० मध्ये तीन शतकांची नोंद आहे. यातील एक शतक त्याने आयपीएलमध्ये तर दोन आंतरराष्ट्रीय सामन्यात झळकावली आहेत.  

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:west indies vs india 1st t20 international kl rahul needs 121 runs to break babar azam world record