पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

INDvsWI T20 : पंतला संधी मिळणार का? विराटनं दिलं सॉलि़ड उत्तर

विराट कोहली

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेला शुक्रवारपासून सुरुवात होत आहे. हैदराबादच्या मैदानावर होणाऱ्या सलामीच्या सामन्यापूर्वी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. सध्याच्या भारतीय संघात उत्तम ताळमेळ असून हाच संघ जवळपास ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-२० विश्वचषकात दिसेल, असे संकेतही कोहलीने दिले. 

पैशांची अफरातफर प्रकरणात मेस्सी पुन्हा गोत्यात

यावेळी त्याला ऋषभ पंतच्या खराब कामगिरीबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. सध्याच्या घडीला ऋषभ पंत फॉर्ममध्ये दिसत नाही. डीआरएससह यष्टिमागे आणि फलंदाजीत त्याने अनेक चुका केल्याचे गेल्या काही सामन्यातून समोर आले. त्यामुळे त्याला सलामीच्या सामन्यात संधी मिळणार का? असा प्रश्न विराट कोहलीला करण्यात आला होता.  

'गब्बर'ला बीसीसीआयकडून 'जबराट' शुभेच्छा!

विराट म्हणाला की, आम्हाला ऋषभ पंतच्या क्षमतेवर विश्वास आहे. चांगली कामगिरी करणे ही खेळाडूची जबाबदारी असते. अगदी त्याच प्रमाणे क्षमता असलेल्या खेळाडूला संधी देणे ही आमची जबाबदारी आहे, अशा शब्दांत ऋषभ पंतला पुन्हा संधी मिळेल, असे संकेत कोहलीने दिले. रोहित शर्माच्या विधानाचा दाखला देत कोहलीने पंत एकदा लयीत आला तर त्याला रोखणे अशक्य होईल, असेही म्हटले.
 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:West Indies tour of India 2019 India vs West Indies T20I Rishabh Pant pant cant be isolated here to support him says virat kohli