विंडीज विरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय सलामीवीर रोहित शर्मा (१५९) आणि लोकेश राहुल (१०२) यांनी मजबूत पाया रचल्यानंतर युवा श्रेयस अय्यरने ऋषभ पंतच्या साथीने अखेरच्या षटकात तुफान फटकेबाजी केली. पंत आणि अय्यर या दिल्लीकरांनी विशाखापट्टणमच्या मैदानात २४ चेंडूत ७३ धावांची भागीदारी केली.
NDvsWI : वर्षाअखेरपर्यंत रोहित शर्माच टॉपर राहणार की, ...
या भागीदारीमध्ये भारताच्या डावातील ४७ वे षटक घेऊन आलेल्या रोस्टन चेसची श्रेयस अय्यरने चांगलीच धुलाई केली. या षटकातील पहिला चेंडू पंचांनी नो बॉल घोषीत केला. यावेळी स्टाइकवर असलेल्या श्रेयसने एक धावही घेतली. पंतने एक धाव घेत स्टाइक पुन्हा श्रेयसकडे दिले.
बॉक्सिंग: 'सुपर मॉम'विरुद्ध भिडण्याची भाषा करणाऱ्या झरीनची नवी मागणी
त्यानंतर श्रेयस अय्यरने चेसचा चांगलाच समाचार घेतला. दुसऱ्या आणि तिसऱ्या चेंडूवर २ षटकार चौथ्या चेंडूवर चौकार आणि अखेरच्या दोन चेंडूवर २ षटकार खेचत श्रेयसने क्रिकेट चाहत्यांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. चेसचं हे षटक सामन्यातील सर्वात महागडे षटक ठरले. विडींजला ते किती महाग ठरणार हे सामन्याच्या निकालानंतरच समजेल. आपल्या ५ षटकात चेसने ९.६० च्या सरासरीने ४८ धावा दिल्या. यात १ नो बॉल आणि व्हाइडच्या रुपात ३ अवांतर धावांचा समावेश होता.