विशाखापट्टणमच्या मैदानात रंगलेल्या विंडीज विरुद्धच्या 'करो वा मरो' सामन्यात फिरकीपटू कुलदीप यादवने एकदिवसीय क्रिकेटमध्ये दुसऱ्यांदा हॅटट्रिकचा पराक्रम करुन दाखवला. आपल्या या कामगिरीच्या जोरावर त्याने सामना भारताच्या बाजूने वळवला. एकदिवसीय क्रिकेटमध्ये दोनवेळा हॅटट्रिक घेणारा कुलदीप यादव पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे. २०१७ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात कुलदीपने एकदिवसीय क्रिकेटमधील पहिली हॅटट्रिक नोंदवली होती.
INDvsWI : वर्षाअखेरपर्यंत रोहित शर्माच टॉपर राहणार की, ...
विंडीजच्या डावातील ३४ व्या षटकातील चौथ्या चेंडूवर त्याने लयीत खेळत असलेल्या शाय होपला ७८ धावांवर माघारी धाडले. होपने उत्तुंग टोलवलेला चेंडू भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने सीमारेषेवर उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाचा नजारा दाखवत झेलला. त्यानंतर कुलदीपने जेसन होल्डरला चकवा दिला. या विकेटमध्ये कुलदीप एवढीच मेहनत ऋषभ यष्टिमागे पंतने घेतली. त्याने सुरेख स्टंपिग करत कुलदीपच्या हॅटट्रिकमध्ये हातभार लावला. होल्डरची जागा घेण्यासाठी मैदानात उतरलेल्या अल्झारी जोसेफला कुलदीपने केदारकरवी झेलबाद करत एकदिवसीय कारकिर्दीतील दुसरी हॅटट्रिक पूर्ण केली.
IND vs WI : 1B Nb 1 6 6 4 6 6.. असे होते सामन्यातील सर्वात महागडे षटक
एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक हॅटट्रिक नोंदवण्याचा विक्रम हा श्रीलंकेच्या मलिंगाच्या नावे आहे. त्याने तब्बल तीनवेळा हॅटट्रिक घेतली आहे. त्यानंतर वासिम आक्रम, शकलेन मुश्ताक, चमिंड वास ट्रेंड बोल्ड आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी दोनवेळा असा पराक्रम केला आहे.