पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

INDvsWI T20 Series 'गब्बर'च्या दुखापतीनंतर संजूला मिळाला 'न्याय'

संजू सॅमसन आणि शिखर धवन

India Squad for T20 Series Against West Indies:  टीम इंडियाचा सलामीवीर शिखर धवनने विंडीज विरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतून माघार घेतली आहे. धवनच्या जागी आता संजू सॅमसनला संधी देण्यात आली आहे. गुडघ्याला झालेल्या दुखापतीमुळे त्याला मालिकेला मुकावे लागत असल्याचे वृत्त आहे. 

'विराटच्या जन्मापूर्वीपासून टीम इंडिया जिंकतेय'

सय्यद मुश्ताक अली चषक स्पर्धेतील सामन्यात धवनच्या डाव्या गुडघ्याला गंभीर दुखापत झाली होती. सुरतमध्ये झालेल्या दिल्ली महाराष्ट्र यांच्यातील सामन्यात दिल्लीचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या धवनला ही दुखापत झाली होती. बीसीसीआयने या वृत्ताला दुजोरा दिला असून टी-२० सामन्यात तो खेळणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.  

...तरच टी-२० वर्ल्डकपमध्ये धोनीही खेळताना दिसेल

२१ नोव्हेंबरला विंडीज विरुद्ध मायदेशात होणाऱ्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची निवड करण्यात आली होती. या संघात शिखर धवनला स्थान देण्यात आले होते. इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलिया विरुद्ध धडाकेबाज शतकानंतर दुखापतीमुळे त्याला स्पर्धेतून माघार घ्यावी लागली होती. त्याची दुखापत आणि त्यामुळे खालवलेली कामगिरी भारतीय संघासीठी चिंतेचा विषय ठरत आहे. टी-२० सामन्यासाठी संघ निवडीवेळी संजू सॅमसनकडे दुर्लक्ष करुन धवनला संधी देण्यात आल्याची चर्चा क्रिकेट वर्तुळात रंगली होती. मात्र त्याच्या दुखापतीनंतर संजू सॅमसनला न्याय मिळाला आहे. त्याला टीम इलेव्हनमध्ये स्थान मिळणार का? आणि तो संधीच सोनं करणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.  
 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:West Indies tour of India 2019 ind vs wi squad indian t20 squad against west indies sanju samson replaces injured shikhar dhawan for t20 series against west indies