पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

INDvsWI T20 : सलामीचा सामना मुंबईऐवजी हैदराबादमध्ये, पण...

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज सामने

भारत आणि वेस्टइंडीज यांच्यातील ६ डिसेंबरला मुंबईत नियोजित असणारा सलामीचा टी-२० सामना आता हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. ६ डिसेंबर रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन आणि अन्य काही कार्यक्रमामुळे मुंबई पोलिसांनी सामन्यासाठी पोलीस बंदोबस्त पुरवण्यास नकार दिला होता. त्यानंतर सामन्याच्या नियोजित स्थान बदलण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे. एएनआयने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.  

INDvsWI T20 Series 'गब्बर'च्या दुखापतीनंतर संजूला मिळाला 'न्याय'

सलामीचा सामना हैदराबादच्या मैदानात रंगणार असला तरी टी-२० मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना मुंबईच्या मैदानात खेळवण्यात येईल. वेस्ट इंडीजचा संघ भारत दौऱ्यावर तीन  टी-२० आणि तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. दुसरा टी-२० सामना हा तिरुअनंतपूरम येथ रंगणार आहे. 

'ती' खुश तर 'मी' खुश हे मला कळलंय : धोनी

याशिवाय चेन्नई, विशाखापट्टणम आणि कटक येथे तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील सामने खेळवण्यात येणार आहेत. यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मुंबई पोलिसांच्या भूमिकेनंतर मुंबई क्रिकेट असोसिएशनला खासगी सुरक्षा कंपनीकडून सेवा घ्यावी लागणार होती. मागील वर्षी देखील सुरक्षिततेच्या पार्श्वभूमीवर वानखडेच्या मैदानातवरील सामना हा ब्रेबोर्न स्टडियमवर स्थलांतरित करावा लागला होता. मात्र यावेळी मालिकेतील अखेरच्या सामन्याच्या ठिकाणी सलामीचा सामना तर अखेरचा सामना मुंबईत खेळवण्याच निर्णय घेण्यात आला.   

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:West Indies tour of India 2019 1st T20i between India and West Indies now shifted Mumbai to Hyderabad