पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'बॉल टॅम्परिंग'मुळे या खेळाडूवर निलंबनाची कारवाई

चेंडू कुरतडल्याने कॅरेबियन खेळाडू अडचणीत

वेस्ट इंडिजचा यष्टिरक्षक आणि फलंदाज निकोलस पूरनला चार सामन्यांसाठी निलंबित करण्यात आले आहे. वेस्ट इंडिज आणि अफगाणिस्तान यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील तिसऱ्या सामन्यात पूरनने चेंडू कुरतडल्याप्रकरणी त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. पूरनने आपली चूक मान्य केली आहे.

INDvsBAN : कोणाला मिळणार संधी अन् कोण ठरणार भारी!  

पूरनने याप्रकरणी सार्वजनिकरित्या माफी देखील मागितली आहे. या कारवाईमुळे त्याला चार टी-२० सामन्याला मुकावे लागणार आहे. यासह त्याच्या खात्यात पाच डिमेरिट गुणही जमा झाले आहेत. वेस्ट इंडिज आणि अफगाणिस्तान यांच्यातील मालिकाही लखनऊच्या मैदानात खेळवण्यात आली होती.

सायना पहिल्याच फेरीत गारद, सिंधूची आगेकूच

सोमवारी झालेल्या सामन्यात निकोलस चेंडू कुरतडण्याचे कृत्य करताना पकडला गेला. आयसीसीने दिलेल्या माहितीनुसार, व्हिडिओ फुटेजमध्ये हाताच्या अंगठ्याच्या नकाने तो चेंडू कुरतडताना आढळले आहे. क्रिकेट आचारसंहितेनुसार त्याने २.१४ चे उल्लंघन केले असून त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.