पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

WI vs IND : विंडीजच्या 'वजनदार' कॉर्नवॉलच्या नावे अनोखा विक्रम

रहकीम कॉर्नवॉल

India vs West Indies 2019, 2nd Test at Sabina park: भारत आणि विंडीज यांच्यातील दुसऱ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात रहकीम कोर्नवॉलने पदार्पणातच अनोख्या विक्रमाची नोंद केली. विंडीज कर्णधाराने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. दुसऱ्या सामन्यात कर्णधाराने आपल्या ताफ्यात  कॉर्नवॉलला संधी दिल्याचे जाहीर केले. 
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ६ फूट ६ इंच उंचीच्या आणि जवळपास १४० किलो वजन असणाऱ्या कॉर्नवलचा संघात समावेश होतात क्रिकेटच्या इतिहासात एका अनोख्या विक्रमाची नोंद झाली. आतापर्यंतच्या क्रिकेटमध्ये तो सर्वाधिक वजन असणारा खेळाडू आहे. 

विंडीजचा धाकड गडी वजन कमी करण्यासाठी करतोय मोठी कसरत

यापूर्वी ऑस्ट्रेलिया के वारविक आर्मस्ट्राँग (१३३-३९ किलो) याचा विक्रम मोडीत काढला. क्रिकेटच्या १४२ वर्षांच्या इतिहासातील रहकीम सर्वाधिक वजन असलेला खेळाडू आहे. आर्मस्ट्राँगने १९०२ पासून १९२१ दरम्यान एकूण ५० स्थानिक कसोटी सामने खेळले होते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कॉर्नवॉलने पदार्पण केले असून तो  विंडीजचे किती सामन्यात प्रतिनिधीत्व करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.  यापूर्वी ड्वेन लेवेरोक (१२७ किलो) याने  २००७ च्या विश्वचषकात बरमुडा राष्ट्राचे प्रतिनिधीत्व केले होते.

 

WI vs IND, Video : मंयकच्या फलंदाजीवेळी निर्णयात झोल, अंपायर ट्रोल

२६ वर्षीय रहकीम कॉर्नवॉलने ५५ फर्स्ट क्लास सामन्यात २३.९० च्या सरासरीने २६० विकेट घेतल्या आहेत. तर त्याच्या नावे २ हजार २४४ धावाही जमा आहेत. आपल्या पदार्पणाच्या सामन्यात पहिल्या दिवशी कॉर्नवॉलने पुजाराला माघारी धाडले. याशिवाय त्याने दोन अप्रतिम झेलही टिपले. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: west indies mountain man Rahkeem Cornwall creates history with this unique record on Test debut