भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात सुरु असलेल्या तीन सामन्यांच्या मालिकेतील सलामीच्या सामन्यात कॅरेबियन ताफ्याने विराट सेनेला पराभवाचा दणका दिला. या विजयासह विंडीजने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. सलामीच्या सामन्यात दिमाखदार विजय मिळवणाऱ्या विंडीजच्या आनंदात आयसीसीने मिठाचा खडा टाकलाय.
सचिनला क्रिकेटमधला महत्त्वपूर्ण सल्ला देणारा हॉटेल वेटर अखेर सापडला
पहिल्या सामन्यात निर्धारित वेळेत षटक न टाकल्यामुळे विंडीज संघावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. आयसीसी कलम २.२२ च्या नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी संघाच्या एकूण मानधनातील तब्बल ८० टक्के रक्कम कपात करण्यात आली आहे.
IPL 2020 Auctions : टॉप बकेटमध्ये दोन भारतीयांसह चार परदेशी खेळाडू
आयसीसी कलम २.२२ च्या नियमानुसार, निर्धारित वेळेपेक्षा कमी षटके टाकल्यामुळे अधिक वेळ घेतलेल्या प्रत्येक षटकानुसार २० टक्के दंड आकरण्यात येतो. भारताविरुद्धच्या पहिल्या सामन्यात विंडीजने ४ षटके निर्धारित वेळेत पूर्ण केली नाहीत. त्यामुळे त्यांना ८० टक्के दंड आकारण्यात आल्याची माहिती आयसीसीने एका पत्रकाच्या माध्यमातून दिली आहे. वेस्ट इंडिजचा कर्णधार कायरन पोलार्ड याने चुक मान्य केल्यामुळे याची अधिकृत सुनावणीची वेळ आली नाही.