पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

एमिरेट्स एअरलाइन्समुळे गेलची पंचाईत

ख्रिस गेल

वेस्ट इंडिजचा स्फोटक फलंदाज ख्रिस गेल याच्याकडे तिकीट असताना त्याला बिझनेस क्लासमध्ये बसण्याची परवानगी नाकारण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. गेलने ट्विटरच्या माध्यमातून विमान कंपनीवरील आपला संताप व्यक्त केला आहे. त्याने ट्विटमध्ये लिहलंय की, माझ्याकडे बिझनेस क्लासचे तिकीट असताना मला इकोनॉमी क्लासमध्ये बसण्याचा सल्ला देण्यात आला.    

Video : संघ हरला, पण कार्तिकनं तमाम क्रिकेट चाहत्यांची मनं जिंकली

एमिरेट्स एअरलाइन्सची सेवा भयावह आणि संतापदायी होती, असा उल्लेखही त्याने आपल्या ट्विटमध्ये केला आहे. माझे तिकीट आरक्षित होते. मात्र बिझनेस क्लासमध्ये जागा नसल्याचे सांगत मला इकोनॉमिक्स क्लासमध्ये जाण्याचा सल्ला देण्यात आला. परिणामी मला दुसऱ्या विमानाची प्रतिक्षा करावी लागली, असेही त्याने म्हटले आहे.  

नदालचा नादखुळा परफॉमन्स! वर्षभराच्या प्रतिक्षेनंतर पुन्हा अव्वलस्थानी

४० वर्षीय गेलने ऑगस्टमध्ये वेस्ट इंडिजकडून शेवटचा एकदिवसीय सामना खेळला होता. २८४ एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात त्याने ३७.१२ च्या सरासरीने ९ हजाराहून अधिक धावा केल्या आहेत. यात  २३ शतकं आणि ४९ अर्धशतकांचा समावेश आहे. २०१५ मध्ये झिम्बाब्वेविरोधात ख्रिस गेलने २१५ धावा केल्या होत्या. विश्वचषकातली ही त्याची पहिली द्विशतकी खेळी होती. कसोटीत त्रिशतक, एकदिवसीय सामन्यात द्विशतक आणि आंतरराष्ट्रीय टी २० सामन्यात शतक झळकवाणारा ख्रिस गेल हा जागतिक क्रिकेटमधला एकमेव फलंदाज आहे.  

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: west indies cricketer chris gayle lashes out at airline for not allowing him to board flight