पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ज्युनिअर टीम इंडियाने विंडीज अ विरुद्धची मालिका जिंकली

ज्युनिअर टीम इंडिया

टीम इंडिया वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाण्यापूर्वी विंडीजमध्ये असलेल्या ज्युनिअर टीम इंडियाने अर्थात भारत अ संघाने पाचवा वनडे सामना जिंकत मालिका ४-१ अशी खिशात घातली. भारत 'अ' आणि वेस्ट इंडिज 'अ' यांच्यातील पाच सामन्यांच्या अधिकृत वनडे मालिकेत सलग तीन विजय नोंदवत भारताने यापूर्वीच मालिका खिशात घातली होती. चौथा सामना वेस्ट इंडिज 'अ' संघाने जिंकला होता. त्यानंतर ज्युनिअर टीम इंडियाने विजयाने मालिका संपवली. 

सचिन-हिमा यांच्यात रंगला ट्विटरवर संवाद

पाचव्या आणि अखेरच्या वनडे सामन्यात वेस्ट इंडिज 'अ' संघाने प्रथम फलंदाजी करताना ४७.४ षटकात २३६ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना भारताकडून रितुराज गायकवाड, शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर यांच्या अर्धशतकाच्या जोरावर भारत 'अ' संघाने ३३ षटकात दोन गडी गमावत विजय प्राप्त केला. 

काश्मीरमध्ये असेल लेफ्टनंट कर्नल महेंद्रसिंह धोनीची पोस्टिंग

भारत-'अ' संघातील नवदीप सैनी, दीपक चाहर आणि राहुल चाहर यांनी प्रत्येकी दोन-दोन गडी बाद केले.  ४० चेंडूत ६९ धावांची आक्रमक खेळी करणाऱ्या शुभमन गीलला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: west indies cricket team shubman gill india national cricket team cricket india one day international india a won by 4 1