क्रिकेटच्या मैदानात उत्तुंग फटेकबाजीनं बाप माणूस म्हणून आपली ओळख निर्माण करणारा वेस्ट इंडिज संघाचा अष्टपैलू आंद्रे रसेलच्या घरी चिमुकली परी अवतरली आहे. रसेलची पत्नी सेसिम लोरा हिने एका मुलीला जन्म दिला आहे. कॅरेबियन क्रिकेटरने चिमकल्या मुलीचा हात पकडत काढलेला एक फोटो सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करत आपल्या चाहत्यांना आपल्या आयुष्यातील गूड न्यूज दिली आहे.
... म्हणून खेळापेक्षा तिच्या नेलपेंटची झाली चर्चा!
त्याने शेअर केलेल्या फोटोत मुलीचं नावही लिहिलंय. अमाय्याचा या दुनियेत स्वागत आहे, माझ्या घरी नन्ही परी दिल्याबद्दल परमेश्वराचे खूप खूप आभार! या कॅप्शनसह त्याने लेकीचा हात धरुन काढलेला फोटो शेअर केलाय. यापूर्वी एका पार्टीचे आयोजन करुन त्याने आपल्या घरी नवा पाहुणा येणार असल्याची माहिती मित्रमंडळाला दिली होती. या पार्टीमध्ये तो आपल्या पत्नीसोबत तो क्रिकेट खेळताना दिसला होता.
NZvsIND: ...तर संघाचे नेतृत्व सोडेन, केनचा स्ट्रेट ड्राईव्ह!
यावेळी त्याच्या पत्नीने पांढऱ्या रंगाचा चेंडू हातात घेतल्याचे पाहयला मिळाले होते. पत्नीचा हा फोटो शेअर करत रसेलने ती मुलगी आहे तर... अशी प्रतिक्रिया दिली होती. एवढेच नाही तर मुलगा किंवा मुलगी असा मी भेदभाव करत नाही, असा उल्लेख देत त्याने एक सामाजिक संदेशही दिल्याचे पाहायला मिळाले होते. आंद्रे रसेल इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून प्रतिनिधीत्व करताना पाहायला मिळते. आयपीएलमधील धडाकेबाज खेळीने त्याने भारतामध्येही मोठा चाहता वर्ग कमावला आहे.