पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

तुझी बोटं छाटून टाकू; आर अश्विनला विरोधी संघाने दिली होती धमकी

आर अश्विन

भारतीय क्रिकेट संघाचा हुकमी फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने लहानपणी घडलेला एक धक्कादायक अनुभव सांगितला आहे. आर अश्विनला त्याच्या विरोधी संघातील खेळाडूंनी पकडून तुझी बोटं छाटून टाकू अशी धमकी दिली होती. याचा खुलासा स्वत: अश्विनने क्रिकबझला दिलेल्या एका मुलाखती दरम्यान केला आहे.  

माझगाव परिसरातील जीएसटी भवनला भीषण आग

अश्विनने सांगितले की, 'मी १४-१५ वर्षांचा असताना आपल्या मित्रांसोबत टेनिस बॉल स्पर्धा खेळायचो. एक दिवस आमची टीम या स्पर्धेमध्ये अंतिम फेरीमध्ये पोहचली. अंतिम सामना खेळण्यासाठी मी घरातून बाहेर पडत होतो. त्याचवेळी ४-५ मुलं रॉयल इन्फिल्डवरुन आले. त्यांनी मला अंतिम सामना खेळण्यासाठी तुला घेऊन जाण्यासाठी आलो असल्याचे सांगितले.'

... तर दिल्लीत काँग्रेस पक्ष सत्तेत असता, मिलिंद देवरांचे प्रत्युत्तर

'त्यावेळी मला वाटले चांगली कामगिरी करत अंतिम सामन्यात पोहचल्यामुळे मला घेण्यासाठी आले असावे. मला खूप चांगले वाटले. मी रॉयल इन्फिल्डवर बसून त्यांच्यासोबत गेलो. त्यांनी मला एका चहाच्या स्टॉलवर घेऊन गेले. त्याठिकाणी त्यांनी मला बसवले. खाण्यासाठी ऑर्डर केली.', असे अश्विनने सांगितले.  

भारताच्या विकासदराच्या अंदाजात मूडीजकडून आणखी कपात

आर अश्विनने पुढे असे सांगितले की, 'दुपारी साडेतीन -चारच्या सुमारास सामना सुरु व्हायची वेळ झाली चला आपण निघूया असे मी म्हणालो. त्यावेळी त्यांनी मला जाऊन दिले नाही. आम्ही विरोधी संघातील आहोत असे त्यांनी मला सांगितले. मी अंतिम सामना खेळू नये यासाठी ते मला घेऊन गेले होते. जर तू याठिकाणावरुन पळण्याचा प्रयत्न केला तर तुझी बोटं छाटून टाकू अशी धमकी त्यांनी दिली होती.'

'इंदुरीकरांचे कीर्तन जनप्रबोधनासाठी, एका वाक्यानं वाईट ठरवू नका'

आर अश्विन भारतीय कसोटी संघाचा महत्वाचा भाग आहे. २१ फेब्रुवारीपासून न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिका सुरु होणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे. या कसोटी मालिकेमध्ये आर. अश्विन खेळणार आहे. 

... अखेर एअरटेलने १०००० कोटी सरकारकडे जमा केले