पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

विजय शंकरच्या दुखापतीवर बुमराहने दिली रिअ‍ॅक्शन

जसप्रीत बुमराह

अष्टपैलू विजय शंकरच्या दुखापतीनंतर भारतीय ताफ्यातील डेथ ओव्हर स्पेशलिस्ट जसप्रीत बुमराहने पत्रकारांसमोर स्पष्टीकरण दिले. गोलंदाजी करत असताना समोर असलेल्या फलंदाजाला दुखापत करण्याचा विचार कधीच मनात नसतो. पण काही वेळा दुर्देवाने फलंदाजाला इजा पोहचते. विजय शंकरसोबत घडलेली घटना अशीच आहे. पण तो आता ठिक आहे, असेही बुमराहने म्हटले आहे.   

ऋषभ पंतला अफगाणिस्तान विरुद्ध संधी मिळणार?

साऊथहॅम्पटनच्या मैदानात नेट प्रॅक्टिसदरम्यान बुमराहने टाकलेल्या यॉर्कर चेंडूवर अष्टपैलू विजय शंकरला दुखापत झाली होती. चेंडू लागल्यानंतर तो मैदानात वेदनांनी त्रासलेला दिसला. त्याला लंगडत लंगडतच मैदानातून बाहेर जावे लागले होते. विजय शंकरची दुखापत गंभीर नसल्याचे समोर येत आहे. पण तो अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात खेळण्याबाबत सध्या संभ्रम आहे. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील सामन्याआधी तो पूर्णपणे तंदूरुस्त झाला नाही तर त्याच्याऐवजी पंतला संधी मिळण्याची शक्यता आहे. 

धवनशिवायही भारत वर्ल्ड कप जिंकू शकतो: मायकल हसी

यापूर्वी सलामीवीर शिखर धवन  दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर पडला आहे. त्याच्यानंतर पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भुवनेश्वर कुमारला स्नायूदुखापतीमुळे पहिल्या पॉवर प्लेमध्येच मैदान सोडावे लागले होते. या सामन्यात विजय शंकरने भुवीचे षटकपूर्ण करताना गोलंदाजीत कमालीची कामगिरी केली होती. भुवनेश्वरला दुखापतीतून सावरण्यास काही कालावधी लागणार असल्यामुळे तो काही सामन्यांना मुकणार आहे.