पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

टेनिस कोर्टवर लढणारा जोकोविच चक्क सुमो पहिलवानासोबत भिडला!

जोकोविच उतरला आखाड्यात

सर्बियाचा स्टार टेनिस स्टार नोव्हाक जोकोविचला आपण कोर्टवर संघर्ष करताना पाहिले आहे. पण टोकियोमध्ये तो सुमो पहिलवानाशी भिडल्याचे पाहायला मिळाले. टेनिस जगतात दबदबा निर्माण केलेल्या नोव्हाक जोकोविचने कुस्तीच्या काही क्लुप्या देखील शिकल्या. 

एटीपीच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन जोकोविचच्या आखाड्यातील तीन व्हिडिओ शेअर केले आहेत. यातील एका व्हिडिओमध्ये जोकोविच सुमो पहिलवानाला आखाड्यातून बाहेर ढकलताना दिसतो आहे. त्याचा हा संघर्ष अपयशी ठरतो. जोकोविच ज्या सुमो पहिलवानांसोबत दोन हात करण्यासाठी आखाड्यात उतरला त्यांनी कुस्तीतून निवृत्ती घेतली आहे.  

उसेन बोल्टलाही जमलं नाही ते १० महिन्याच्या लेकराच्या आईनं करुन दाखवलं

कोर्टवर जलवा दाखवणाऱ्या जोकोविचने कुस्तीच्या आखाड्यातील आपला अनुभव देखील शेअर केला. तो म्हणाला की. आख्याड्यात त्या पहिलवानांसमोर मी शून्य असल्याची जाणीव झाली. त्यांच्यासमोर मी अशक्त असल्याचे अनुभवले. पहिलवानांची लवचिकता मी जवळून अनुभवली.