पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

HBD Dhoni Video: माहीच्या वाढदिवस सेलिब्रेशनचा खास क्षण

महेंद्रसिह धोनीने लाडक्या लेकीसह कापला केक

भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि सध्याच्या यष्टिरक्षक महेंद्रसिंह धोनीने आपला ३८ वा वाढदिवस साजरा केला. बीसीसीआयने त्याच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचा एक व्हिडिओ अधिकृत अकाउंटवरुन शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये धोनी आपल्या लाडक्या लेकीसह केक कापताना दिसते.

धोनीने केक कापल्यानंतर पहिला घास लेकीला भरवला. त्यानंतर त्याने पत्नी साक्षीला केक भरवला. साक्षीनेही त्याला केक भरवल्याचे या व्हिडिओमध्ये पाहायला मिळते. संघातील सर्व खेळाडू यशस्वी कर्णधाराच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमध्ये सहभागी झाले होते. रोहित शर्मा आपल्या पत्नी रितिकासह उपस्थित होता.