पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Video : बोलू पण बंबईया हिंदीत, चहलसोबत शास्त्रींच शास्त्र

युजवेंद्र चहल आणि रवी शास्त्री

विश्वचषक स्पर्धेतील आपल्या पहिल्या सामन्यापूर्वी भारतीय क्रिकेट संघातील वातावरण हे आनंदी-आनंद गडे...! असेच आहे. स्पर्धेतील पहिल्या सामन्यापूर्वी भारतीय खेळाडू कसून सराव तर करत आहेतच. त्याशिवाय सरावानंतरच्या मोकळ्या वेळेत खेळाडू आपल्यातील सुप्त गुण देखील दाखवून देत आहेत. 

सराव सामन्यापूर्वी रोहित शर्माच्या हातात दिसलेला बूम आता युजवेंद्र चहलकडे गेल्याचे पाहायला मिळत आहे. रोहित शर्मानंतर आता युजवेंद्र चहलने सहकाऱ्यांची मुलाखत घेतल्याचे पाहायला मिळाले. यावेळी त्याने आपले गुरु अर्थात भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्रींच्या इंग्लंडमधील आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न केला. गप्पा गोष्टी सुरु झाल्यानंतर रवी शास्त्रींनी त्याच्या प्रश्नाला उत्तर देण्यापूर्वी सावध पवित्रा घेतल्याचे पाहायला मिळाले. त्यांच्या भूमिकेमुळे युजवेंद्र चहलच्या अंगी फिरकीशिवाय असणारा एक सुप्त गुण समोर आला आहे.

Video : भारतीय संघातील सल्लू भाईजान अन् रोहितची 'गंमत जंमत'

युजवेंद्र चहलची हिंदी भाषेवर चांगली पकड आहे. त्यामुळेच त्याने प्रश्न विचारायला सुरुवात केल्यानंतर रवि शास्त्री त्याला म्हणाले, "आपण बोलू पण तुझी शुद्ध हिंदी माझ्यासाठी बाउन्सर आहे. त्यामुळे तू कृपया मुंबईच्या हिंदी भाषेत बोल"  शास्त्री यांच्याशिवाय युजवेंद्रने कुलदीप यादवशीही गप्पा गोष्टी केल्या. बीसीसीआयने आपल्या ट्विटर अकाउंटवरुन युजवेंद्र चहलने घेतलेल्या मुलाखतीचा व्हिडिओ शेअर केला आहे.  

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:watch how ravi shastri goes down to memory lane while talking to yuzvendra chahal on chahal tv