पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ICC चा क्रिकेट चाहत्यांना सवाल, रिप्लाय देण्यासाठी व्हिडिओ नक्की पाहा

बेन स्टोक्स

इंग्लंडमधील ओव्हलच्या मैदानातून यजमान इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामन्याने बाराव्या विश्वचषकाच्या हंगामाला सुरुवात झाली. या सामन्यात इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेला १०४ धावांनी पराभूत केले. इंग्लंडच्या विजयात अष्टपैलू बेन स्टोक्सने सिंहाचा वाटा उचलला. या सामन्यात त्याने फलंदाजी गोलंदाजी आणि अफलातून क्षेत्ररक्षणाने सर्वांचे लक्ष वेधले.

ICC WC : स्टोक्सच्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर इंग्लंडची विजयी सलामी

सलामीच्या सामन्यात सर्वाधिक ८९ धावा करत स्टोक्सने इंग्लंडच्या धावफलकावर आव्हानात्मक अशी धावसंख्या उभारण्यात मदत झाली. शिवाय त्याने गोलंदाजीला उतरल्यावर दक्षिण आफ्रिकेच्या दोन फलंदाजांना तंबूत धाडले. याशिवाय सीमारेषेवर त्याने घेतलेला झेल हा यंदाच्या विश्वचषक स्पर्धेतील पहिला सर्वोत्कृष्ट झेल ठरला.   

ICC World Cup : एन्गिडीला सलग षटकार खेचत मॉर्गनने नोंदवला खास विक्रम

दक्षिण आफ्रिकेतील डावातील आदिल रशीद घेऊन आलेल्या ३५ व्या षटकात एंडिले फेलुकवायोने डीप मिडविकटच्या दिशेने हवेत चेंडू टोलवला. मात्र सीमारेषेवर उभा असलेल्या बेन स्टोक्सने अप्रतिम क्षेत्ररक्षणाचा नजारा दाखवत सुपरमॅनच्या तोऱ्यात हवेत झेप घेत षटकारा वाटत अणाऱ्या चेंडूवर फलंदाजाला माघारी धाडले. आयसीसीने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन बेन स्टोक्सच्या झेलचा व्हिडिओ शेअर केला आहे. तुम्ही यापूर्वी असा झेल पाहिला आहे का? असा प्रश्नही आयसीसीने  क्रिकेट चाहत्यांना विचारला आहे. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:watch england all rounder ben stokes stunning-catch at boundary line in world cup match against south africa at kennington oval ground london