पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Video U-19 WC : फायनलमध्ये 'जंटलमन गेम' बदनाम!

भारत-बांगलादेश यांच्यातील खेळाडू मैदानात भिडले

चारवेळा १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धा जिंकणाऱ्या युवा टिम इंडियाला युवा बांगलादेश संघाने पराभवाचा धक्का दिला. दक्षिण आफ्रिकेतील पोशेफस्टॉममच्या मैदानात रंगलेल्या अंतिम सामन्यात पावसाच्या व्यत्ययानंतर डकवर्थ लुईसच्या नियमानुसार, बांगलादेशला विजयी घोषीत करण्यात आले. बांगलादेशने हा सामना ३ गडी राखून जिंकत ऐतिहासिक कामगिरी नोंदवली. पण आनंद साजरा करताना त्यांना खिलाडूवृत्तीचा विसर पडल्याचे दिसले. परिणाम दोन्ही संघातील खेळाडू एकमेकांच्या अंगावर धावून जातानाचे चित्र पाहायला मिळाले.  

बांगलादेश U-19 वर्ल्डकपचा चॅम्पियन, भारताचा धक्कादायक पराभव

रकिबुल हसनने विजयी धाव घेतल्यानंतर बांगलादेशचे खेळाडू आनंद व्यक्त करण्यासाठी मैदानात धावत आले. आनंद व्यक्त करतानाचे त्यांचे भाव खिलाडूवृत्तीच्या चिंधड्या करणारे होते. त्यांच्या जल्लोष करण्याच्या पद्धतीमुळे भारतीय संघातील खेळाडूंचा संतप्त अनावर झाल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर मैदानात  दोन्ही संघातील खेळाडू  एकमेकांच्या अंगावर जाण्याचा प्रकार पाहण्याची वेळ क्रिकेट चाहत्यांवर आली.
बांगलादेशचे खेळाडू आक्रमक हावभाव करत आनंद साजरा करत असताना एका भारतीय खेळाडूने बांगलादेशी खेळाडूला हुसकावले. त्यानंतर  दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले. मैदानातील खेळाडूंमध्ये या प्रकारानंतर भारतीय संघाचे प्रशिक्षक पारस म्हांब्रे भारतीय खेळाडूंना पॅव्हेलियनमध्ये बोलवताना दिसले. 

संघाला सामना जिंकून देण्यासाठी नाबाद ४३ धावांची खेळी करणारा बांगलादेशी कर्णधार अकबर अलीने या घटनेसंदर्भात माफीही मागितली आहे. मैदानात नेमक काय घडल याची काही कल्पना नसल्याचे सांगत त्याने पारितोषक वितरण समारोहामध्ये संघाच्यावतीने माफी मागितली. विश्वचषकापूर्वी आम्ही आशिया चषकामध्ये भारतीय संघाकडून पराभूत झालो होतो. त्यामुळे संघ सहकाऱ्यांच्या भावना या टोकाला गेल्याचे पाहायला मिळाले, असेही त्याने म्हटले आहे. 

NZvsIND:..म्हणून कोचवर आली फिल्डिंग करण्याची वेळ

अंतिम सामन्यानंतर मैदानात घडलेला प्रकार क्रिकेट खेळाला बदनाम करणारा असल्याची प्रतिक्रिया भारतीय संघाचा कर्णधार प्रियम गर्गने केले आहे. आम्ही पराभूत झालो. पण विजयाचा आनंद आक्रमकरित्या साजरा करत बांगलादेशच्या खेळाडूंमुळे हा वादाला तोंड फुटले, असेही प्रियम गर्गन म्हटले आहे. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Watch Clash On Field As Bangladesh U 19 Players Get Aggressive With Indian Team After World Cup Final