पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Video : हेझलवूडच्या बाउन्सरने स्टोक्सच्या हेल्मेटचे तुकडे

बेन स्टोक्स

अ‍ॅशेस कसोटी मालिकेतील इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा सामना सुरू आहे. चौथ्या दिवशीच्या खेळात ऑस्ट्रेलिन गोलंदाजांनी इंग्लंडच्या फलंदाजांना बाऊन्सरने हैराण करण्याचे अस्त्र अवलंबल्याचे चित्र पाहायला मिळाले. हेझलवूडचा एका उसळ्यात्या चेंडूने इंग्लंच्या अष्टपैलूच्या हेल्मेटचा काही भाग तुटल्याचे पाहायला मिळाले. सुदैवाने यावेळी स्टोक्सला कोणत्याही प्रकारची इजा झाली नाही. मात्र, हा प्रसंग दोन्ही संघातील खेळाडूंशिवाय सामना पाहणाऱ्या तमाम क्रिकेट चाहत्यांना स्तब्ध करुन टाकणारा होता.  

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Flying 🔥 #benstokes #ashes #cricket #AusvsEng

A post shared by Cricket Highlights (@cricket_highlights_) on

BWF WC 2019: अखेर सिंधूने सुवर्ण कामगिरी करुन दाखवली

ऑस्ट्रेलियाने दिलेल्या ३५९ धावांचा पाठलाग करताना इंग्लंडच्या सलामीवीरांच्या फ्लोपशोनंतर कर्णधार जो रुट (७७) आणि जो डेन्ली (५०) यांनी संघाचा डाव सावरला. अष्टपैलू बेन स्टोक्सने महत्त्वपूर्ण अर्धशतकासह इंग्लंडच्या आशा पल्लवित ठेवल्या आहेत. अर्धशतकासाठी स्टोक्सने दिडशेहून अधिक चेंडू खेळले. सामना जिंकून मालिकेत बरोबरी साधण्यासाठी इंग्लंडची सर्व मदार ही बेन स्टोक्सच्या खेळीवर अवलंबून आहे. त्याला तळाचे फलंदाज कशी साथ देणार हे पाहणे देखील महत्त्वपूर्ण ठरेल.

INDvWI: रोचसमोर पुजाराची पुन्हा शरणागती, मयंकचाही फ्लॉप शो