पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'कोहली वनडे क्रिकेटमध्ये ७५ ते ८० शतकांचा पल्ला गाठेल'

विराट कोहली

विंडीज विरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात विराट कोहलीने कारकिर्दीतील ४२ वे शतक झळकावले. त्यानंतर आता विक्रमादित्य सचिन तेंडुलकरच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील शंभर शतकांच्या विक्रमाचा पाठलाग करणारा कोहली एकदिवसीय क्रिकेटमध्ये ८० शतके सहज झळकावेल, अशी भविष्यवाणी भारताच्या माजी कसोटीपटू आणि स्थानिक क्रिकेटमध्ये धावांची बरसात करण्यासाठी ओळखला जाणाऱ्या वासिम जाफरने केली आहे.  

अल्प विश्रांतीनंतर विराटच्या भात्यातून अखेर शतक निघाले

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली एकदिवसीय क्रिकेटमध्ये ७५ ते ८० शतके सहज झळकावेल, असे जाफरने म्हटले आहे. भारताकडून ३१ कसोटी सामन्यात प्रतिनिधीत्व करणाऱ्या जाफरने ट्विटच्या माध्यमातून विराट कोहलीच्या शतकाबद्दल भविष्यवाणी केली आहे. त्याने ट्विटमध्ये लिहिलंय की, अकरा डावात शतकांच्या हुलकावणीनंतर विंडीज विरुद्धच्या सामन्यात कोहलीच्या भात्यातून शतकी खेळी पाहायला मिळाली. एकदिवसीय क्रिकेटमध्ये कोहली ७५ ते ८० शतके सहज नोंदवले, असे मला वाटते.

३० वर्षांपूर्वी 'त्यांनी' सचिन तेंडुलकर, तर आता अर्जुनची केली निवड 

 सध्याच्या घडीला विराटच्या नावे २३८ सामन्यात ४२ शतकांचा समावेश आहे. तर ७७ कसोटी सामन्यात त्याने २५ शतके झळकावली आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके ठोकण्याचा पराक्रम हा विक्रमादित्या सचिन तेंडुकरच्या नावे आहे. सचिनने एकदिवसीय आणि कसोटीमध्ये मिळून शतकांचे शतक रचले आहे. सचिनचा या विक्रमाचा कोहली 'विराट' वेगाने पाठलाग करत आहे.