पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

स्थानिक क्रिकेटच्या बादशहाची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

वासीम जाफर

स्थानिक क्रिकेटमधील रनमशिन वासिम जाफरने शनिवारी क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती जाहीर केली. निवृत्तीनंतर त्याने सर्व संघ सहकार्यांचे आभार मानले आहेत. आपल्या देशाचे प्रतिनिधीत्व करण्याची आई वडिलांची इच्छा पूर्ण केली, याचा अभिमान वाटतो, असेही जाफरने म्हटले आहे. ४२ वर्षीय जाफरने २००८ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कानपूरच्या मैदानात अखेरचा कसोटी सामना खेळला होता.

IPL 2020 : देशासाठी या अष्टपैलूने घेतली आयपीएलमधून माघार

सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, सौरव गांगुली, अनिल कुंबले, व्हीव्हीएस लक्ष्मण, विरेंद्र सेहवाग आणि एमएस धोनी यांच्यासारख्या दिग्गज क्रिकेटर्ससोबत ड्रेसिंग रुम शेअर करायला मिळाली, हे मी माझे भाग्य समजतो, अशी प्रतिक्रिया वासिम जाफरने दिली आहे. जाफरने १९९६-९७ पासून २०१२-१३ या हंगामात ८ वेळा रणजी चषक उंचावणाऱ्या मुंबईचे प्रतिनिधीत्व केले आहे. एवढेच नाही तर त्याने विदर्भ संघाला सलग दोन रणजी चषक जिंकून देण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. जाफरने स्थानिक क्रिकेटमधील दुसऱ्या सामन्यात त्रिशतक झळकावत भारतीय राष्ट्रीय संघात स्थान मिळवले होते.  

ICC WC:पत्नीचा खेळ पाहण्यासाठी स्टार्कने आफ्रिका दौरा अर्ध्यावर सोडला

प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये २६० सामन्यात जाफरने जवळपास १९ हजार ४१० धावा केल्या आहेत. यात  ५७ शतके आणि ९१ अर्धशतकांचा समावेश आहे. जाफरने १५० रणजी सामने खेळणारा पहिला खेळाडू आहे. रणजीत त्याच्या नावे १२ हजारहून अधिक धावांची नोंद आहे. क्रिकेटच्या तिन्ही प्रकारातून निवृती घेतल्यानंतर जाफर आयपीएलमधील किंग्ज इलेव्हन पंजाबच्या फंलदाज प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहे.