पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

WADA ची रशियावर कारवाई, ऑलिम्पिकमध्ये सहभागी होण्याला ४ वर्षांची बंदी

जागतिक अँटी डोपिंग एजन्सी

उत्तेजक द्रव्य चाचणीतील माहितीत (अँटी-डोपिंग) फेरफार केल्याच्या कारणावरून जागतिक अँटी डोपिंग एजन्सीने (वाडा) रशियावर गंभीर कारवाई केली आहे. २०२० मध्ये टोकियोत होणाऱ्या ऑलिम्पिक आणि २०२२ मध्ये बीजिंगमध्ये होणाऱ्या हिवाळी ऑलिम्पिकमध्ये सहभागी होण्याला बंदी घातली आहे.

कर्नाटक निकालांनंतर देवेंद्र फडणवीसांचे सूचक ट्विट

वाडाचे प्रवक्ते जेम्स फित्झगेराल्ड म्हणाले, या संदर्भातील ज्या काही शिफारशी होत्या त्या एकमताने स्वीकारण्यात आल्या आहेत. वाडाच्या कार्यकारी मंडळाची बैठक झाल्यानंतर त्यामध्ये घेण्यात आलेल्या निर्णयांची माहिती त्यांनी दिली. रशियातील अँटी डोपिंग एजन्सीवरही चार वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. या एजन्सीचे निकाल आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्य केले जाणार नाहीत. 

Citizenship Amendment Bill च्या समर्थनात शिवसेना

दरम्यान, या निर्णयानंतरही रशियातील धावपटू टोकियोमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये सहभागी होऊ शकतात. पण ते देशाचे प्रतिनिधी म्हणून नाही. तर स्वतंत्र धावपटू म्हणूनच सहभागी होऊ शकतात. रशियातील डोपिंग व्यवस्थेचा भाग नाही हे सुद्धा या धावपटूंना सिद्ध करावे लागणार आहे.