पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'या प्लेइंग इलेव्हनमध्ये विराट सेनेला रोखण्याचा दम'

विराट आणि रोहित

विराटच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ घरच्या मैदानावर दमदार कामगिरी करत आहे. पुण्याच्या मैदानात भारतीय संघाने घरच्या मैदानावर सातत्यपूर्ण विजयी मालिका कायम ठेवली. मागील ३२ कसोटी सामन्यात भारताने केवळ एक सामना गमावला आहे. रांचीच्या मैदानातही भारतीय संघाचे पारडे जड दिसत आहे. त्यामुळे घरच्या मैदानावर भारतीय संघ पुन्हा सव्वाशेर ठरण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. 

सलामीवीर मयंक अग्रवाल, रोहित शर्मा यांच्यासह कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणेच्या कामगिरीनंतर भारतीय गोलंदाजीमध्येही ताकद दिसत आहे. परिणामी पाहुण्या संघांना भारतासमोर गुडघे टेकायची वेळ येते. भारतीय संघाला घरच्या मैदानावर पराभूत करणे सध्यस्थितीला कोणत्याही संघासाठी एक कसोटीच आहे. 

6-6-0-1-6-0-6-0-6-W उमेश यादवचा अनोखा विक्रम!

दरम्यान भारतीय संघाची कामगिरी पाहता दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार ग्रॅहम स्मिथ आणि भारताचा माजी कसोटीपटू व्हीव्हीएस लक्ष्मण या जोडीने भारतीय संघाला घरच्या मैदानात पराभूत करण्याची क्षमता असणाऱ्या वर्ल्ड इलेव्हन संघ निवडला आहे. हा संघच भारतीय संघाला पराभूत करु शकेल, असे या दोघांना वाटते. या दोन दिग्गजांनी निवडलेल्या संघात क्रिकेट जगतातील विविध संघातील खेळाडूंचा समावेश आहे. यात न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन, ऑस्ट्रेलियन स्टिव्ह स्मिथ यांना स्थान मिळाले आहे. स्मिथ-लक्ष्मण या समालोचकांनी आपल्या वर्ल्ड इलेव्हनमध्ये डेन एल्गर आणि तमिम यांनी डावाची सुरुवात करावी वाटते. याशिवाय श्रीलंकन कर्णधार दिमुथ करुणारत्नेलाही त्यांनी स्थान दिले. असून पाकच्या बाबर आझमला त्यांनी पाचव्या क्रमांकावर पसंती दिली आहे. त्यांनी निवडलेल्या प्लेइंग इलेव्हनमध्येच विराट सेनेला घरच्या मैदानावर रोखण्याचा दम आहे, अशी भावना स्मिथ-लक्ष्मण जोडीने व्यक्त केली आहे.   

INDvsSA Day 2 Stumps : आफ्रिका २ बाद ९ धावा, दुसरा दिवसही भारताचाच!

वर्ल्ड ड्रीम इलेव्हन संघ : डेन एल्गर, तमिम इक्बाल, केन विलियमसन, स्टीव स्मिथ, बाबर आझम, शाकिब अल हसन, बेन स्टोक्स, क्विंटन डी कॉक, पेट कमिंस, जोफ्रा आर्चर आणि नॅथन लॉयन.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: VVS Laxman and Graeme Smith world dream XI to challenge Team India in Tests in home soil