पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

PKL : मराठमोळ्या श्रीकांतच्या जोरावर यूपी योद्धा संघानं मारलं मैदान

सामन्याला कलाटणी देणारा क्षण

प्रो कबड्डी हंगामाच्या सातव्या हंगामातील जयपूरच्या सवाई मानसिंह स्टेडियममध्ये रंगलेल्या दुसऱ्या सामन्यात यूपी योद्धाने तमिल थलायवाजला ४२-२२ अशा फराकाने एकतर्फी पराभूत केले. या विजयानंतर यूपी योद्धा ५३ गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. दबंग दिल्ली (६९) गुणासह अव्वलस्थानी असून बंगाल वॉरियर्स (६३) आणि हरयाणा स्टिलर्स (५४) अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत.  

PKL : जयपूर-गुजरात 'टाय-टाय' फिनिश!

महाराष्ट्राचा श्रीकांत जाधव या सामन्याता हिरो ठरला. त्याने चढाईत ८ गुणांची कमाई केली. तर तामिल थलायवाजचा स्टार राहुल चौधरीला चढाईत केवळ ५ गुण मिळवता आले. परिणामी तामिळ थलायवाज संघाला पराभवाला सामोरे जावे लागले. पहिल्या सत्रात तमिल थायवाजने आक्रमक सुरुवात केली. सुरुवातीला राहुल चौधरी लयीत दिसला. दुसऱ्या बाजूने अजीत कुमारही गुणात भर घालत होता. मात्र पहिल्या सत्रातील अखेरच्या काही मिनिटांत श्रीकांत जाधवने चढाईत ४ गड्यांना बाद करत यूपी योद्धाला पुन्हा सामन्यात आणले. त्याच्या या एका कामगिरीमुळे यूपी योद्धा पहिल्या सत्रात १३-१४ अशा केवळ एका गुणाने पछाडीवर राहिला.

PKL : अनुप कुमार यांच्याकडून पंकजला मिळाला खास 'गुरुमंत्र'

दुसऱ्या सत्रात यूपी योद्धा संघाने दमदार कामगिरी केली. १९ मिनिटांच्या खेळानंतर ५ गुणांनी पिछाडीवर असलेला यूपी योद्धाचा संघाने २८ मिनिटाला २६-१६ अशी मोठी आघाडी घेतली. यात त्यांनी तामिळ थलायवाज दोनवेळा ऑल आउट केले. त्यानंतर प्रतिस्पर्धी संघाल कोणतीही संधी न देता अखेर यूपी योद्धाने २० गुणांच्या फरकाने सामना खिशात घातला.