पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

PKL : यू मुम्बाचे 'प्ले ऑफ'मधील स्थान पक्के

यू मुम्बा आणि पाटणा पायरेट्स

प्रो कबड्डीचा सातवा हंगाम आता शेवटच्या टप्यात आला आहे. पंचकुलाच्या ताऊ देवी लाल स्पोर्ट्स कॉम्पेल्क्समध्ये रंगलेल्या ११७ व्या सामन्यात यू मुम्बाने पाटणा पायरेट्सला ३०-२६ अशी मात दिली. या विजयासह यू मुम्बाने प्ले ऑफमधील आपले स्थान पक्के केले. फजेल अत्राचलीने बचाबफळीत ४ गुण मिळवत यू मुम्बाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. चढाईमध्ये अभिषेकने सर्वाधिक ७ गुणांची कमाई केली. 

AUSvsSL: एलिसा हिलीचा विश्व विक्रम, फिचंलाही टाकले मागे

पहिल्या सत्रात यू मुम्बाने दमदार सुरुवात केली. पाटणाच्या स्टार चढाईपट्टू प्रदीप नारवालला फजेल अत्राचलीने सुरुवातीलाच बाहेर काढले. त्यानंतर आठव्या मिनिटाला यू मुम्बाने पाटणाच्या संघाला ऑल आउट केले. ११-३ अशा पिछाडीवर असताना पाटणाने पुन्हा जोरदार कमबॅक केले त्यामुळे पहिल्या सत्रात यू मुम्बाला १७-१३ अशी अल्प आघाडी मिळाली.

शतकी खेळीनंतर हिटमॅन रोहितची 'मन की बात'

दुसऱ्या हंगामात देखील पाटणा कमबॅक करण्यासाठी प्रयत्नशील दिसत होते. अखेरच्या चार मिनिटात पाटणा अवघ्या २ गुणांनी पिछाडीवर होता. मात्र अखेरच्या मिनिटात दोन गुण मिळवत यू मुम्बाने सामना ४ गुणांच्या फरकाने विजय नोदंवत प्ले ऑफमध्ये स्थान मिळवले. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:VIVO Pro Kabaddi Season 7 U Mumba v Patna Pirates at Tau Devi Lal Stadium in Panchkula Result