पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

PKL : पुणेरी पलटन अन् तेलुगू टायटन्स सामन्यादरम्यान अनोखा विक्रम

पुणेर पलटण आणि तेलुगू टायटन्स संघातील सामन्यातील क्षण

प्रो कबड्डीच्या सातव्या हंगामातील पंचकुलाच्या मैदानात रंगलेल्या ११९ व्या सामन्यात पुणेरी पलटणने तेलुगू टायटन्सला ५३-५० असे पराभूत करत त्यांना प्ले ऑफच्या शर्यतीतून बाहेर काढले. प्ले ऑफमधून बाहेर पडलेल्या दोन्ही संघातील या सामन्यात प्रो कबड्डीच्या आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वाधिक १०३ गुणांची नोंद झाली. यापूर्वी दोन्ही संघांनी मिळून १०२ गुण केल्याचा विक्रम होता.

बॉक्सिंग वर्ल्ड चॅम्पियनशिप : मेरी कॉमसह या युवा महिलांकडून पदकाची आस

पहिल्या हंगामात पुणेरी पलटणने पाचव्या मिनिटालाच तेलुगू टायटन्सला ऑल आउट केले. त्यानंत १३ व्या मिनटात तेलुगू टायटन्सचा संघ दुसऱ्यांदा ऑल आउट झाला. पहिल्या सत्रात पुण्याच्या संघाने सिद्धार्थ देसाईला चारवेळा टॅकल केले. आक्रम खेळाच्या जोरावर त्यांनी पहिल्या सत्रात ३१-१६ अशी आघाडी घेतली.

फेडररला लागलंय बॉलिवूडचं याड, नेटकऱ्याने सुचवले हे चित्रपट

दुसऱ्या सत्रात सुशांत साइलने सुपर रेड करत ४ खेळाडूंना बाद केले. त्यानंतर तेलुगू टायटन्सने सामन्यात पुनरागमन केले. त्यानी पुणेरी पलटणला पहिल्यांदा ऑल आउट करत प्ले ऑफच्या शर्यतीमधील आपले आव्हान जिवंत ठेवण्याच्या दिशेने वाटचाल केली. पण अखेर त्यांना तीन गुणांनी पराभव स्विकारावा लागल्याने त्यांचे स्वप्न भंगले आहे.    
 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: VIVO Pro Kabaddi Season 7 Telugu Titans vs Puneri Paltan Final Result With Historical Mark