पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

PKL : ७ व्या हंगामात 'नवा गडी नवं राज्य' यू मुम्बा-बंगळुरु बुल्स आउट

दबंग दिल्ली आणि बंगाल वॉरियर्स फायनलध्ये

प्रो कबड्डीच्या सातव्या हंगामातील अहमदाबादच्या मैदानात रंगलेल्या पहिल्या सेमी फायनलमध्ये दिल्ली दबंगने  ऐतिहासिक विजय नोंदवत पहिल्यांदा फायनलमध्ये प्रवेश केला. दबंग दिल्लीने मागील दोन हंगामात सलग फायनल मारणाऱ्या बंगळुरु बुल्सच्या संघाला ४४-३८ अशा फरकाने पराभूत केले. नवीन कुमारने या विजयात मोलाचा वाटा उचलला. त्याने हंगमातील २१ वा आणि सलग २० वा सुपर १० ची कामगिरी करत त्याने संघासाठी १५ गुणांचे योगदान दिले.  बंगळुरुच्या पवन कुमारने सुपर १० सह १८ गुण मिळवले मात्र तो संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरला. 

मुंबईकराचा द्विशतकी विश्वविक्रम 'यशस्वी'

दुसऱ्या सामन्यात महाराष्ट्रातील कबड्डी प्रमींची निराशा झाली. बंगाल वॉरियर्सने यू मुम्बाला ३७-३५ असे पराभूत करत फायनल गाठली. बंगालच्या विजयात यावेळी नव्या चेहऱ्याने आपली क्षमता सिद्ध केली. सुकेश हेगडेने चढाईमध्ये ८ महत्त्वपूर्ण गुण मिळवत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. यू मुम्बाकडून अभिषेक सिंहने सुपर १० ची कामगिरी केली. पण त्याची ही कामगिरी संघाला चौथ्यांदा फायनलमध्ये प्रवेश देण्यात कुचकामी ठरली.

टी-20 : भारत-पाक सामना खेळवण्यासाठी ICC उत्सुक, पण...

विशेष म्हणजे सेमी फायनलमधील निकालानंतर यंदाच्या हंगामात प्रो कबड्डीमध्ये 'नवा गडी नव राज्य' ही अनुभूती पाहायला मिळणार आहे.  दबंग दिल्ली आणि बंगाल वॉरियर्स यांच्यात जेतेपदासाठी लढत होईल. दोन्ही संघ पहिल्यांदाच अंतिम फेरीत पोहचले आहेत. १९ ऑक्टोबरला हे दोन्ही संघ प्रो कबड्डीचा सातवा हंगामातील जेतेपदासाठी ऐकमेकांविरुद्ध पंगा घेतील.  

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: VIVO PRO KABADDI SEASON 7 SEMI FINAL result Bengaluru Bulls and U Mumba out Dabang Delhi met Bengal Warriors in Final