पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

PKL : अनुप कुमार यांच्याकडून पंकजला मिळाला खास 'गुरुमंत्र'

पुणेरी पलटणच्या घरच्या मैदानातील अखेरच्या सामन्यात पंकजने दमदार खेळ केला.

प्रो कबड्डी लीगच्या सातव्या हंगामात घरच्या मैदानावर रंगलेल्या सामन्यांची शुक्रवारी सांगता झाली. पुणेरी पलटणने बंगळुरु बुल्सविरुद्धच्या सामन्यात ४२-३८ असा दिमाखदार विजय नोंदवला. या सामन्यात महाराष्ट्राचा आणखी एक हिरा प्रो-कबड्डीच्या मैदानात चमकण्यास सुरुवात झाल्याची चाहूल मिळाली. मागील दोन सामन्यात ७ आणि ८ गुणांच्या योगदानाने आपल्यातील चुणूक दाखवणाऱ्या पंकज मोहितेने घरच्या मैदानातील अखेरच्या सामन्यात तब्बल १७ गुणांची कमाई करत 'सुपर  १०' चा पराक्रम करुन दाखवला. त्याच्या चढाईतील चपळाई बघण्यासारखी होती. 

PKL : पुण्याच्या मैदानात बंगाल वॉरियर्सचा ऐतिहासिक विजय

आपल्या खेळीनं त्याने कबड्डीच्या तमाम चाहत्यांना आनंद दिलाच शिवाय प्रशिक्षक अनुप कुमार यांनाही प्रभावित केले. सामन्यानंतर अनुप कुमार यांनी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव देखील केला. पंकजचे भविष्य उज्वल आहे. त्याच्यामध्ये महाराष्ट्रासाठीच नव्हे तर राष्ट्रीय संघात प्रतिनिधीत्व करण्याची क्षमता असल्याचे अनुप कुमार प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हणाले.  

दमदार! विनेश फोगट ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणारी पहिली भारतीय कुस्तीपटू

घरच्या मैदानातील धमाकेदार कामगिरीनंतर पंकजची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी पत्रकारांनी त्याच्याभोवती गराडा केला होता.  यावेळी अनुप कुमार यांनी 'हर मॅच मे अच्छा खेलेगा तो ऐसेही बोलता रहेगा' अशा हटके शब्दांत त्यांनी पंकजला भविष्यातील वाटचालीसाठी खास शुभेच्छा दिल्याचे पाहायला मिळाले. हा त्याच्यासाठी एक गुरुमंत्रच आहे. अनुप कुमार यांचे हे शब्द महाराष्ट्राच्या उमद्या गड्याला निश्चितच प्रोत्साहन देणारे ठरतील. यातून तो पुणेरी पलटणसाठी तर दमदार कामगिरी करेलच शिवाय महाराष्ट्र आणि भारतीय संघाला सुवर्णपदक मिळवून देण्याचे स्वप्नही साकार करु शकेल. 


 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:VIVO Pro Kabaddi Season 7 Puneri Paltan vs Bengaluru Bulls match coach Anup Kumar praise PERFECT RAIDER OF MATCH PANKAJ MOHITE