पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

PKL : जयपूर-गुजरात 'टाय-टाय' फिनिश!

जयपूर विरुद्ध गुजरात

जयपूरच्या सवाई मानसिंह स्टेडियमवर रंगलेल्या प्रो कबड्डी हंगातील शंभराव्या सामन्यात जयपूर पिंक पँथर्स आणि गुजरात फॉर्न्चुनजाएंट्स यांच्यातील सामना बरोबरीत सुटला. जयपूरचा डिफेंडर विशालने 'हायफाइव' कामगिरी करत ९ गुणांची कमाई केली. तर दिपकने ४ गुण मिळवले. गुजरातकडून सचिनने चढाईत ५ गुण मिळवले तर परवेश भैसवालने 'हायफाइव' च्या कामगिरीची नोंद केली. जयपूरकडून -५-५  सुपर टॅकल पाहायला मिळाले. 

INDvsSA सामना आफ्रिकेविरुद्ध पण, स्पर्धा विराट-रोहितमध्येच

सामन्याच्या पहिल्या सत्रात यजमानांनी सावध सुरवात केली. त्यानंतर जयपूरने खेळात बदल करत अचानक आक्रमक अंदाज दाखवून दिला. १२ व्या मिनिटाला गुजरातच्या संघाला ऑल आउट करत सामन्यात १२-६ अशी आघाडी घेतली. जयपूरकडून दिपक चढाई आणि विशालची बचावफळीतील उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर या सत्रात जयपूरने १५-१० अशी आघाडीही घेतली. 

PKL : अनुप कुमार यांच्याकडून पंकजला मिळाला खास 'गुरुमंत्र'

दुसऱ्या सत्रातील २५ व्या मिनिटात गुजरातचा संघाने जयपूरला ऑल आउट करत सामन्यात पुन्हा रंगत निर्माण केली. सचिन चढाईत लक्षवेधी कामगिरी करत असताना दुसऱ्या बाजूने बचावफळीत सुनील आणि भैसवालच्या खेळीच्या जोरावर गुजरातने सामन्यात कमबॅक केले. ३२ व्या मिनिटाला सामना २१-२१ असा बरोबरीत आला. अखेरच्या चार मिनिटांत दोन्ही संघांनी प्रत्येकी सात-सात गुण मिळवल्याने सामन्याचा निकाल २८-२८ असा अनिर्णितच संपला. विवो प्रो कबड्डीच्या आतापर्यंतच्या इतिहासातील या दोन्ही संघात बरोबरीत सुटलेला हा पहिला सामना ठरला.