पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

PKL पुणेरी फलटणची 'हाररकी', बंगाल वॉरियर्सने दबंग दिल्लीला टाकले मागे

जयपूरच्या मैदानात रंगलेल्या सामन्यातील क्षण

प्रो कबड्डीच्या सातव्या हंगामात जयपूरच्या मैदानात बुधवारी रंगलेल्या पहिल्या सामन्यात बंगाल वॉरियर्सने तेलुगू टायटन्स ४०-३९ गुणांनी पराभूत केले. या विजयासह बंगाल वॉरियर्सचा संघ प्रो कबड्डीच्या गुणतालिकेत दबंग दिल्लीला मागे टाकत अव्वलस्थानी पोहचला आहे. आतापर्यंतच्या सामन्यात दंबग दिल्लीच्या संघाने पहिल्यांदाच अव्वलस्थान गमावले आहे.

ICC T20 Rankings : रोहित शर्मा 'टॉप टेन'मध्ये, धवन कोहली उंबरठ्यावर

बंगाल वॉरियर्सकडून मनिंदर सिंगने पुन्हा एकदा सुपर १० ची कामगिरी करुन संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. त्याने या सामन्यात आपल्या संघाला सर्वाधिक १७ गुण मिळवून दिले. बचाव फळीत रिंकू नरवाल आणि बलदेव सिंहने प्रत्येकी ३-३ गुणांची भर घातली. तेलुगू संघाची मदारही सिद्धार्थ देसाईवर होती. सिद्धार्थने या सामन्यात सुपर १० केले मात्र तो संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरला. सामन्याच्या १४ व्या मिनिटात बंगाल वॉरियर्सने तेलुगू टायटन्सला ऑल आउट केले. दुसऱ्या सत्रात तेलुगू टायटन्स संघानेही बंगाल वॉरियर्सला ऑल आउट केले. पण त्यांना सामन्यावरील पकड मजबूत करता आली नाही.    

 

सायनाने अर्ध्यावर सामना सोडला, सिंधूचाही खेळ खल्लास!

 दुसऱ्या सामन्यात पुणेरी फलटणला आणखी एका पराभवाचा सामना करावा लागला. जयपूर पँथर्सने त्यांना ४३-३४ अशा फरकाने पराभूत करत घरच्या मैदानावर आपला पहिला विजय साजरा केला. दिपक नरवालने या हंगामातील पहिल्यांदा सुपर १० पूर्ण करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. बचावफळीतील दिपक हुड्डा आणि संदीप ढुल यांनी संघाच्या गुणात प्रत्येकी ४-४ गुणांची भर घातली. पुणेरी पलटणकडून पंकज मोहितेने पुन्हा एकदा दमदार कामगिरी केली. त्याने सुपर १० पूर्ण करत १२ गुण मिळवले. सामन्यात त्याने सर्वाधिक गुण मिळवले पण संघाला विजय मिळवून देण्यात हे गुण काहीच कामी आले नाहीत.  

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:VIVO Pro Kabaddi Season 7 Jaipur Pink Panthers beat Puneri Paltan and Bengal Warriors beat Telugu Titans