पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

PKL : अवघ्या एका गुणाने हरियाणा स्टिलर्सने मैदान मारलं

हरियाणा विरुद्ध गुजरात सामन्यातील अप्रतिम क्षण

प्रो कबड्डीच्या सातव्या हंगामात घरच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात हरियाणा स्टिलर्सने पाहुण्या गुजरात फॉर्च्यून जायंट्सला अवघ्या १ गुणाने पराभूत करत सामना खिशात घातला. पहिल्या सत्रात गुजरातचा संघ १९-१४ गुणांसह आघाडीवर होता. मात्र दुसऱ्या सत्रात दमदार खेळी करत हरियाणाने सामना ३९-३८ असा खिशात घातला. 

शास्त्रींची नियुक्ती करणाऱ्या CAC ला नोटीस, निवड पुन्हा होणार?

हरियाणाकडून विकास कंडोलाने १० तर प्रशांत कुमार रायने ९ गुण मिळवत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. गुजरातच्या रोहित गुलियाने सामन्यात सर्वाधिक ११ गुणांची कमाई केली. पण त्याची ही कामगिरी संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरली. दुसऱ्या बाजूला त्याला सोनूने उत्तम साथ दिली. 

...म्हणून 'टॉस'साठी तीन 'कॅप्टन' मैदानात

हरियाणा स्टिलर्सने  १९ पैकी १२ सामन्यात विजय मिळवत ६५ गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. तर दुसरीकडे २० पैकी ८ सामन्यातील विजयासह गुजरातचा संघ अवघ्या ४५ गुणांसह आठव्या स्थानावर आहे.