पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

PKL : जयपूरचे प्ले ऑफचे आव्हान कायम, हरियाणानेही मैदान मारलं

पहिल्या सामन्यात जयपूर तर दुसऱ्या सामन्यात हरियाणाने मारली बाजी

प्रो कबड्डीच्या सातव्या हंगामात घरच्या मैदानावर रंगलेल्या अखेरच्या सामन्यात हरियाणा स्टिलर्सने तेलुगू टायटन्सला ५२-३२ गुणांनी पराभूत करत शेवट गोड केला. विकास कंडोलाने सर्वाधिक १३ गुण मिळवत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. या हंगमात त्याने दहाव्यांदा 'सुपर टेन' ची कामगिरी केली. तेलुगू टायटन्सकडून खेळणाऱ्या महाराष्ट्राच्या सिद्धार्थ देसाईने या सामन्यात १२ गुण मिळवत 'सुपर टेन'ची किमया साधली पण संघाला विजय मिळवून देण्यात तो पुन्हा एकदा अपयशी ठरला.

पहिल्या सत्रातील आक्रमक खेळानेच हरियाणाने घरच्या मैदानावर विजयी सांगता करण्याची झलक दाखवून दिली. चढाईसह बचावफळीत त्यांनी कमालीचा खेळ दाखवला. विकास कंडोलाने पहिल्या सत्रातच ९ गुणांची कमाई करत तेलुगू टायटन्सला बॅकफूटवर टाकले. त्याची दमदार खेळी बचावफळीतील खेळाडूंनी दिलेल्या उत्तम साथीच्या जोरावर पहिल्या सत्रात हरियाणाने ३०-१२ अशी मोठी आघाडी घेतली. 

पाकच्या PM बद्दल गांगुली म्हणतो, हा क्रिकेटमधला इम्रान नव्हे

दुसऱ्या सत्रातही हरियाणा संघाच्या खेळात आक्रमकता दिसली. सिद्धार्थ देसाईने सुपर टेन करत संघाला सामन्यात परत आणण्याचा प्रयत्न केला. पण  विकास कंडोलाची कामगिरी आणि रवि कुमारचा हाय ५ च्या जोरावर हरियाणाने एक मोठा विजय आपल्या नावे नोंदवला. दरम्यान विकासने आपल्या कारकिर्दीतील ४०० गुणांचा टप्पा पार केला. विजयासह हरियाणाने आपले तिसरे स्थान कायम ठेवण्यात यश मिळवले आहे. प्रो कबड्डीच्या इतिहासात आतापर्यंतच्या ५ पैकी हरियाणा स्टिलर्सची तेलुगू टायटन्सला पराभूत करण्याची ही दुसरी वेळ आहे. 

'महिलांकडे पाहण्याची ही मानसिकता बरी नव्हे'

तत्पूर्वीच्या पहिल्या सामन्यात जयपूर पिंक पँथर्सने बंगळुरु बुल्सला ४१-३४ अशा फरकाने पराभूत केले. जयपूरकडून दिपक नरवालने सुपर टेनची कामगिरी करत सर्वाधिक १६ गुणांची कमाई केली. पहिल्या सत्रात दोन्ही संघात रोमहर्षक रंगत पाहायला मिळाली. जयपूरच्या संघाकडे २०-१८ अशी अल्प आघाडी होती. दुसऱ्या सत्रातील ३६ व्या मिनिटाला दोन्ही संघ ३१-३१ असे बरोबरीत होते. अखेर जयपूरने ७ गुणांनी बाजी मारत प्ले ऑफच्या आपल्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. प्ले ऑफसाठी आता त्यांना यूपी योद्धा संघाला मात द्यावी लागेल.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:VIVO Pro Kabaddi Season 7 Bengaluru Bulls v Jaipur Pink Panthers and Haryana Steelers v Telugu Titans final result