पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

PKL : पुण्याच्या मैदानात बंगाल वॉरियर्सचा ऐतिहासिक विजय

बंगाल वॉरियर्स आणि हरयाणा स्टिलर्स

पुण्यातील म्हाळुंगे बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात रंगलेल्या प्रो कबड्डीच्या सातव्या हंगामातील बंगाल वॉरियर्स आणि हरयाणा स्टिलर्स यांच्यात रंगतदार सामना पाहायला मिळाला. या सामन्यात बंगाल वॉरियर्सने हरयाणाला ४८-३६ अशा फरकाने पराभूत केले. प्रो कबड्डीच्या आतापर्यंतच्या हंगामात हरयणा स्टिलर्सविरुद्ध बंगाल वॉरियर्सचा हा पहिला आणि ऐतिहासिक विजय ठरला.

लोकेश राहुल अडचणीत, हे दोन खेळाडू उभे करु शकतात आव्हान

बंगाल वॉरियर्सच्या विजयात कर्णधार मनिंदर सिंहने मोलाचा वाटा उचलला. त्याने सुपर १० सह चढाईमध्ये संघाला १८ गुण मिळवून दिले. त्याच्या कारकिर्दीतील ही सर्वोत्तम कामगिरी आहे. बलदेव सिंहने हंगामातील सहाव्यांदा 'हायफाई' ची नोंद करत ६ गुणांची कमाई केली. 

INDvSA T20 : कोहलीनं रागानं स्टम्प तोडली, व्हिडिओ होतोय व्हायरल

दिग्गज बचावपटू आणि कर्णधार चेरालाथनच्या अनुपस्थितीत मैदानात उतरलेल्या हरयाणाच्या संघाची सुरुवात निराशजन अशीच होती. सातव्या मिनिटाला हरयाणाचा संघ ऑल आउट झाला. त्यानंतर १३ व्या मिनिटाला बांगाल वॉरियर्संनी त्यांना दुसऱ्यांदा ऑल आउट केले. दुसऱ्या सत्रातही हरयाणाचा ऑल आउट होण्याचा सिलसिला सुरुच राहिल्याचे पाहायला मिळाले.  अखेरच्या सत्रात हरयाणाने उत्तम कागिगिरी करत बंगाल वॉरियर्सला ऑल आउट करण्यात यश मिळवले. मात्र तोपर्यंत त्यांच्या हातून सामना निसटला होता. 
 


  

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: VIVO Pro Kabaddi Season 7 Bengal Warriors defeated Haryana Steelers Shree Shiv Chhatrapati Sports Complex PUNE