पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

प्रो-कबड्डी : भगव्या जर्सीतील पुणेरी पलटनचे नेतृत्व सुरजीत सिंगकडे

पुणेरी पलटनच्या नव्या जर्सीचे अनावरण

प्रो-कबड्डी लीगच्या सातव्या हंगामासाठी पुणेरी पलटनचा संघ सज्ज झाला आहे. यंदाच्या हंगामात सुरजीत सिंग या उमद्या आणि डायनॅमिक खेळाडूकडे संघाचे नेतृत्व देण्यात आले आहे. तिसऱ्या हंगामात सुरजीत सिंग पुण्याचे प्रतिनिधीत्व करताना दिसला होता. मागील वर्षी संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी सांभाळणाऱ्या गिरिष एर्नाक याच्याकडे उप-कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.  

मार्चमध्ये नवीन लोगोचे अनावरण केल्यानंतर प्रो-कबड्डी लीगच्या सातव्या हंगामाला आता काही दिवस बाकी असताना पुणेरी पलटन संघातील खेळाडूंसाठी नव्या जर्सीचेही अनावरण बुधवारी करण्यात आले. महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करणारा पुणेरी पलटन हा संघ भगव्या जर्सीत उमदा खेळ करण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे. संघाच्या भगव्या रंगाच्या जर्सीवर विविध रंगछटासह उत्कृष्ट पॅटर्नसची झलक पाहायला मिळते.  

प्रो-कबड्डीच्या मैदानात आपल्या खेळीने लाखो क्रिडा प्रेमींच्यात मनात घर करणारा अनुप कुमार यंदाच्या हंगामात पुणेरी पलटन संघाचा मार्गदर्शक म्हणून सोबत आहे. अनुप कुमार यांच्यासह संघातील सर्व खेळाडू जर्सी अनावरणाच्या कार्यक्रमात प्रमुख आकर्षणाचे केंद्र ठरले. याव्यतिरिक्त फोर्स मोटर्सच्या क्वालिटी विभागाचे वरीष्ठ उपाध्यक्ष श्री. मकरंद कानडे यांनी देखील यावेळी उपस्थिती लावली होती. 

प्रो कबड्डीनंतर आता टेबल टेनिसमध्येही दिसणार 'पुणेरी पलटण'

या कार्यक्रमात इन्शुअरकॉट स्पोर्टसचे सीईओ श्री. कैलाश कंडपाळ म्हणाले की, "आमचा नवीन लोगो आणि जर्सी मूळच्या ब्रॅण्ड कथेसह संघाची आधुनिक आणि जागतिक ओळख दर्शविणारी आहे. हा नवीन परिचय खेळाच्या नूतनीकरणासह संघाच्या कामगिरीचेही दर्शन घडवतो. या तरुण पलटनची जबाबदारी यापुढे सुरजीत यांच्या हाती असून त्याच्या नेतृत्वाखाली संघ दर्जेदार खेळी करुन दाखवेल. या प्रवासात आम्हाला प्रोत्साहन देणाऱ्या आणि आमच्यासोबत असणाऱ्या सर्व भागीदारांचे मी आभार मानतो."

नवीन उत्साह, जिद्द आणि सर्वोत्‍तम संघ यांसह २० जुलैपासून सुरू होणाऱ्या विवो प्रो-कबड्डी लीगच्या सातव्या हंगामासाठी पुणेरी पलटन सज्ज आहे. पुणेरी पलटन २२ जुलै २०१९ रोजी हैदराबादमध्ये हरियाणा स्टीलर्सविरुद्ध पहिला सामना खेळणार आहे. पुण्यात पुणेरी पलटनच्या होम लीगचे सामने १४ सप्टेंबर २०१९ ते २० सप्टेंबर २०१९ या काळात नियोजित आहेत.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:vivo pro kabaddi league season 7 puneri paltan appointed surjeet singh as captain and unveiled teams new slick orange jersey