पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'विराटची आक्रमकता अंहकार नव्हे तर आत्मविश्वास'

विराट कोहली आणि विवियन रिचर्ड्स

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या मैदानातील आक्रमक अंदाज हा महान क्रिकेटपटू सर विवियन रिचर्ड्स यांना भावला आहे. विराट कोहलीकडे पाहिल्यानंतर आपले जुने दिवस आठवतात, अशी भावनाही वेस्ट इंडिजच्या विवियन रिचर्ड्स यांनी व्यक्त केली आहे. इंडिया टुडेच्या कार्यक्रमात विवियन रिचर्डस यांनी विराटच्या खेळीचे कौतुक केले.

ते म्हणाले की, "मला असे खेळाडू आवडतात. लोक त्याच्या मैदानातील वर्तणूकीला आक्रमकता म्हणतात पण तो स्वत:वरचा आत्मविश्वास असतो. विराटचा अंदाज हा आपल्या घराची चावी आपल्याकडे असल्यासारखी आहे. विराटचा खेळ पाहताना मैदानातील  माझ्या आठवणी जाग्या होतात. त्यावेळी जे माझ्याकडे होते ते आज विराटमध्ये असल्याचे वाटते." 

ICC WC 2019 : दोन शतकांवर तीन अर्धशतकं पडली भारी, पाकचा पहिला विजय

मला भारतीय फलंदाज सर्वाधिक आकर्षित करतात. विराटने एका रात्रीत आत्मविश्वास मिळवलेला नाही. त्याने यासाठी खूप मेहनत घेतली आहे. तो लढवय्या वृत्तीचा असून संघातील इतरांपेक्षा तो सर्वांच्या पुढे राहणे पसंत करतो. विराटच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ ५ जूनला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्याने स्पर्धेला सुरुवात करत आहे. या सामन्यात विराटची भूमिका महत्त्वाची असणार आहे. विराट कोहली चांगल्या फॉमध्ये असून यंदाच्या स्पर्धेत नेतृत्वासह तो फलंदाजीची मदार कशी पेलणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.