पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सेहवाग म्हणतो, कोणी संधी देतं का संधी...मला सिलेक्टर व्हायचंय!

विरेंद्र सेहवाग

आपल्या स्फोटक फलंदाजीने क्रिकेट जगतात एक वेगळी ओळख निर्माण करणारा भारतीय संघाचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग नेहमीच त्याच्या ट्विटने सर्वांचे लक्ष वेधून घेत असतो. प्रतिस्पर्धी गोलंदाजांची भंबेरी उडवणारा सेहवाग ट्विटच्या माध्यमातून केलेल्या बोलंदाजीनंही सर्वांची बोलती बंद करण्यात माहिर आहे. नेहमीच आपल्या हटके अंदाजातील ट्विटनं तो चर्चेत येणाऱ्या सेहवागनं आता एक हैराण करुन सोडणारं ट्विट केलंय.

रोहितचा हटके अंदाजातील फोटो होतोय व्हायरल!

सिलेक्टर व्हायचं आहे, मला कोण संधी देईल? असा प्रस्न त्याने  ट्विटच्या माध्यमातून उपस्थित केला आहे. त्याने आपल्या ट्विटमध्ये लिहलंय की, आजच्या तारखेला इंग्लंडमध्ये १८८ षटके क्षेत्ररक्षण केल्यानंतर सलग दोन डावात मी शून्यावर बाद झालो होतो. इच्छा नसताना मी आर्यभट्टला श्रद्धांजली वाहिली होती, असा उल्लेखही त्याने आपल्या ट्विटमध्ये केला आहे. यावर समिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

Video : पाहा सामन्याला कलाटणी देणारा भुवीचा अप्रतिम झेल

२० आक्टोबर २०१५ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर सेहवाग समालोचन करताना दिसतो. समालोचन करताना आणि ट्विटच्या माध्यमातून प्रतिक्रिया देताना समोरच्याची फिरकी घेणाऱ्या सेहवागच्या या ट्विटवर अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.