पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

धोनीच्या निवृत्तीवर सेहवागची फटकेबाजी

धोनी आणि सेहवाग

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या निवृत्तीवर माजी सलामीवीर विरेंद्र सेहवाग याने मोठे वक्तव्य केले आहे. बीसीसीआयने खेळाडूंच्या वार्षिक करारातून धोनीचे नाव वगळून त्याला निवृत्तीसाठी मुक्त केल्याचे मत सेहवागने व्यक्त केले. सेहवागने क्रिकबजला दिलेल्या मुलाखतीमध्ये धोनीच्या निवृत्तीवर भाष्य केले. धोनीला संघात स्थान दयायचे नाही, हे बीसीसीआयच्या निवड समितीने पक्के केलं आहे. त्यांनी ठरवल्यामुळेच धोनीचा वार्षिक करारात समावेश झालेला नाही. या निर्णयातून त्यांनी धोनीला जेव्हा निवृत्ती घ्यायची ते घेऊ देत, असा संदेशच दिलाय, असे सेहवागने म्हटले आहे.  

Under 19 World Cup : गोलंदाजाने नव्हे मशिनने तोडला अख्तरचा विक्रम!

सेहवाग पुढे म्हणाला की, बीसीसीआयच्या नव्या करारातून धोनीचे नाव वगळण्यात आल्याने कोणताही धक्का बसला नाही. विश्वचषकानंतर धोनी मैदानात उतरलेला नाही. कसोटीमधून धोनीने निवृत्ती घेतली आहे. विश्वचषकापासून  एकदिवसीय संघात त्याच्या नावाचा विचार केला जात नाही. टी-२० संघात त्याला संधी द्यावी की नाही याबाबत निवड समितीमध्ये संभ्रमाची परिस्थिती दिसून येते. त्यामुळे त्याचे नाव वगळल्याने आश्चर्य वाटले नाही, असे सेहवागने सांगितले.  

शुभमन गिलच्या संघाचा विजय विराट सेनेसाठी शुभ संकेत देणारा

बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी धोनीच्या संघातील समावेशाबाबत बोलणे टाळले होते. संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी आयपीएलमधील कामगिरीवर धोनीचे टी-२० मधील भविष्य अवलंबून असेल, असे म्हटले होते.  विश्वचषकापूर्वीपासून धोनीच्या निवृत्तीची चर्चा क्रिकेट वर्तुळात रंगल्याची दिसते. विश्वचषकानंतर तो कधीही निवृत्ती घेऊ शकतो असे बोलले जात आहे. बीसीसीआयच्या करारात स्थान न मिळाल्यानंतर या चर्चा पुन्हा रंगण्यास सुरुवात झाली आहे. धोनीने अद्याप याबाबत आपली भूमिका मांडलेली नाही. जानेवारीपर्यंत यावर काही विचारु नका, असे धोनीने म्हटले होते.  
 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:virender sehwag statement on ms dhoni it is a clear message for ms dhoni says sehwag on dhoni retirement